पालकमंत्री सुभाष देसाई थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील हनुमंतगाव, महालगाव आणि गंगापूर तालुक्यातील वाहेगाव या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा), एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत फळबाग लागवड, ठिबक व तुषार सिंचन, शेततळे, शेततळे अस्तरीकरण, कांदाचाळ आदी योजनेतील कामांची प्रत्यक्ष पाहणी, थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज केली. तसेच शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या...