आमदार,मंत्री किंवा मुख्यमंत्री होणं एकवेळ सोप आहे, पण एकनाथ शिंदे बनणे केवळ अशक्य..

जनदूत टिम    21-Jul-2023
Total Views |
Maharashtra ; 
आज गुरुवार , दर गुरुवारी उपवास करणारे मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे साहेब अक्षरशः उपाशी पोटी दुर्घटनास्थळी पोहोचले.

एकनाथ शिंदे बनणे केवळ अशक्य 
 
इरशालवाडी कडे मार्गस्थ होताना प्रचंड पाऊस, निसरडी वाट. त्यातच माहिती आली की बचाव कार्यातील अग्निशमन दलातील एक जवान दुर्घटनास्थळी जाताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन पावला. खरं तर याच घटनेमुळे दुर्घटनास्थळी जाण्याचा मुख्यमंत्री महोदयांचा निर्धार आणखी पक्का झाला.
 
मदत कार्यात असणाऱ्या इतर जवानांचे आपल्या सहकाऱ्याच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे मनोधैर्य खचू नये म्हणून मा मुख्यमंत्री महोदयांनी ज्या ठिकाणी ( दुर्घटनास्थळी ) मदत होते कार्य सुरू आहे तिथे तात्काळ जाण्याचा निर्णय घेतला.
 
वाटेत जाताना मृतांचे कुटुंबीय - नातेवाईक भेटले , त्यांना मुख्यमंत्री महोदयांनी दिलासा दिला, त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. अक्षरशः जीवानिशी वाचलेल्या या सर्व नागरिकांना मी तुमच्या घरातील आहे, तुमचा आहे , तुमच्या पाठिशी नव्हे तर सोबत आहे, काळजी करू नका असा धीर दिला.
 
मा मुख्यमंत्री महोदय दुर्घटनास्थळी पोहोचले आणि NDRF, TDRF आणि अग्निशमन दलातील सर्व जवानांना आश्वस्त केले, धीर दिला.
 
आज मुसळधार पावसात अवघड पाऊलवाटेने चालत किमान १४ ते १५ किलोमीटर पायी प्रवास झाला असेल...!
 
मा. मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत चालणारे आम्ही तरुण मंडळी थकलो...पण हा माणूस थकला नाही; थांबला नाही...!
 
मुख्यमंत्री होणं एकवेळ सोपं, पण एकनाथ शिंदे बनणे केवळ अशक्य...!! सलग १८ ते २० तास , न थकता - न थांबता काम करणारा अद्वितीय नेता..!!
 
अशा संवेदनशील लोकनेत्या सोबत प्रत्येक आपत्तीमध्ये सोबत म्हणून राहता येतंय हे माझं आणि त्यांचे फॅमिली डॉक्टर डॉ जे बी भोर सर यांचं भाग्य.
 
केरळ महापूर - २०१७, महालक्ष्मी एक्सप्रेस- वांगणी - २०१८ , सांगली - कोल्हापूर महापूर - २०१९ , महाड - चिपळूण महापूर २०२१ या संपूर्ण आपत्तीत मा.एकनाथजी साहेब यांच्यातील एक संवेदनशील माणूस पाहता आला, अनुभवता आला हे माझं भाग्य...
 
म्हणूनच वाटतं की आमदार,मंत्री किंवा मुख्यमंत्री होणं एकवेळ सोप आहे, पण एकनाथ शिंदे बनणे केवळ अशक्य..
 
आपला नम्र,
मंगेश नरसिंह चिवटे,
मूळ संकल्पना तथा कक्ष प्रमुख,
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष.