डॉक्टरांच्या हलगर्जीणामुळे प्रा हरी नरके यांचा मृत्यू ?

डाॅ संदीप कडवे,    10-Aug-2023
Total Views |
Maharashtra : Pune ;
प्रा. हरी नरके ह्रदयविकाराने गेले. त्यांच्या रोगाचे चुकीचे निदान लिलावतीच्या "नामवंत" डाॅक्टरांनी केले, चुकीचे उपचार केले गेले. त्यात त्यांची दहा महिने अपरिमित शारिरीक व मानसिक हानी झाली.

डॉक्टरांच्या हलगर्जीणामुळे प्रा हरी नरके यांचा मृत्यू 
त्यांचा आक्रोश कुणापर्यंतच पोहचला नाही. ज्यांनी समता, बंधुता व न्यायव्यवस्था कायम व्हावी यासाठी आयुष्य वेचले, त्यांना जिवंतपणी न्याय मिळाला नाही. इतका मोठा जनसंपर्क असलेला सामाजिक विचारवंत, शेवटी एकटा पडला, असा त्याचा अर्थ होतो. सर्वसामान्यांनी दाद मागण्यासारखी व निर्वेध न्याय मिळण्यासारखी कायदा सुव्यवस्था व न्याययंत्रणा आज अस्तित्वात नाही असाच त्याचा अर्थ होतो. अशी परिस्थिती कुणावरही ओढवु शकते. ओढवली आहेच, हे नितीन देसाई व इतर अनेक उदाहरणांवरून स्पष्ट होते.

डॉक्टरांच्या हलगर्जीणामुळे प्रा हरी नरके यांचा मृत्यू 
अनैतिक, असामाजिक, चालबाजी, कुचाळक्या, छोटेमोठे गुन्हे, उघड फसवाफसवीची कृत्ये करणारी माणसे एकटी नसतात. त्यांची गॅग टोळी बनते. ही टोळी पांढरपेशी असु शकते. छोटेमोठे गुन्हे करणार्या टोळीपेक्षा अशी पांढरपेशी टोळी अधिक समाजविघातक असते. अशा गॅगला ओळखा, वेळीच आवर घाला. नैतिकतेने वागणारी, स्पष्टवक्ते व निर्भिड मते मांडणारी माणसं एकटी पडतात किंबहुना एकटी पाडली जातात असाच अनुभव मलाही पदोपदी येतोय.
 
असे एकटे पडायचे नसेल तर एक राजकारणविरहीत परंतु अडीअडचणीच्या वेळी, अन्यायाविरूद्ध उभे ठाकणार्या व्यक्तीच्या पाठी उभी राहणारी समाजव्यवस्था, एक स्वतंत्र संस्था, किंबहुना स्वतंत्र सामाजिक न्यायव्यवस्था निर्माण करणे अत्यावश्यक झाले आहे. याची सुरूवात चार समविचारी व्यक्ती एकत्र येऊनच होणार आहे व तेच माझे नम्र आवाहन आहे. दुरून गंमत बघणारे, अनावश्यक मौन बाळगणारे, केवळ स्वार्थ बघणारे, जमल्यास टिंगलटवाळी ट्रोल करणारे, या सर्वांनीच याचा गंभीर विचार करावा. वेळ कुणावरही येऊ शकते.