गोरखाना व मुलाणी आ. निकोले यांचे सर्वात जवळचे सहाय्यक !

जनदूत टिम    01-Jun-2024
Total Views |
गोरखाना व मुलाणी आ. निकोले यांचे सर्वात जवळचे सहाय्यक !
 
डहाणू. (प्रतिनिधी) – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांचे सर्वात जवळचे सहयोगी मध्ये कॉम्रेड चंद्रकांत गोरखाना असून त्यांच्या खालोखाल स्वीय सहाय्यक शाहरुख मुलाणी असल्याचे कळत आहेत.
 
कोण आहेत चंद्रकांत गोरखाना ?
 
कॉम्रेड चंद्रकांत गोरखाना हे अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्य कमिटीचे कार्याध्यक्ष पदावर काम करणारे एक धडाकेबाज पदाधिकारी आहेत. ते कोणत्याही कार्यालयावर मोर्चे, आंदोलने, चक्का जाम आंदोलन, धडक मोर्चे काढण्यात अतिशय चाणाक्ष बुद्धीचे असून त्यांच्या कडे लोकं जमविण्याची एक वेगळी शक्ती असल्याचे कळते.
 
कोण आहेत स्वीय सहाय्यक एस. मुलाणी ?
 
शाहरुख मुलाणी हे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय येथील आमदार विनोद निकोले यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. शाहरुख मुलाणी यांच्या कडे प्रशासकीय कामकाजाचा तगडा अनुभव असल्याचे बोलले जाते. कोणतेही प्रकरण असो..! क्षणात त्याचा निपटारा करण्याचे कौशल्य मुलाणी यांच्या मध्ये आहे. असे अभ्यागत नेहमी बोलत असतात.

Gorkhana and Mulani. Nikolay's closest assistant
 
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या खास लोकांमध्ये कॉम्रेड चंद्रकांत गोरखाना व स्वीय सहाय्यक एस मुलाणी हे दोन नावे आहेत. मतदारसंघात कॉम्रेड चंद्रकांत गोरखाना तर मंत्रालय, विधानभवन येथे स्वीय सहाय्यक एस. मुलाणी, ह्या दोन व्यक्ती आ. निकोले यांच्यासोबत सर्वत्र दिसत असतात. फोन कॉल येण्यापासून लोकांची आमदारांशी ओळख करून देण्यापर्यंत आणि आमदारांच्या प्रत्येक लहान-मोठ्या गरजा पूर्ण करण्यापर्यंत ते सतत सक्रिय असतात.
 
आमदार कॉम्रेड विनोद निकोले हे सध्या त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि झटपट निर्णयांमुळे माध्यमांमध्ये चर्चेत आहेत. त्यांनी आदिवासी, शेतकरी, कामगार यांना दिलेल्या आश्वासनानुसार विविध प्रश्न मार्गी लावण्याने राजकीय जगतात मोठी चर्चा ओढली आहे. यासोबतच माकप आणि बिगर माकपशासित जिल्ह्यांमध्येही त्यांची चर्चा होत असते, मात्र या चर्चेदरम्यान दोन अशी व्यक्ती आहेत. जी आमदार विनोद निकोले यांच्यासोबत सावलीसारखी राहते. ती व्यक्ती आमदार निकोले यांचा उजवा व डावा हात मानली जाते.
 
आमदार निकोले यांना मुलाणी यांचा प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता, वक्तशीरपणा, नम्र स्वभाव, मृदुभाषी इत्यादी गुणांची खात्री पटली आहे. आमदार कॉम्रेड विनोद निकोले हे जितके कणखर स्वभावाचे म्हणून ओळखले जातात तितकेच चंद्रकांत गोरखाना हे नम्र आणि सौम्य मानले जातात. आमदार विनोद निकोले यांचा चेहरा वाचण्याची ताकद गोरखाना व मुलाणी यांच्या मध्ये आहे. त्यामुळेच लोकांचे फोन येण्यापासून ते आमदारांची ओळख करून देण्यापर्यंत ते आमदार निकोले यांच्या लहान-मोठ्या गोष्टींची काळजी घेतात. लोक म्हणतात की, गोरखाना व मुलाणी हे टीम आमदार निकोले मुख्य दुवे आहेत.