प्रशासन सोबत मिलीभगत असणाऱ्या कपिल पाटील यांच्यावर जनता प्रचंड नाराज…!!

भिवंडी लोकसभा मतदार संघातील प्रशासनात झालेले बदल..

जनदूत टिम    04-May-2024
Total Views |
 
प्रशासन सोबत मिलीभगत असणाऱ्या कपिल पाटील यांच्यावर जनता प्रचंड नाराज......!!
 
 जनदूत टिम   
असल्याची अनेक कारणे आहेत त्या कारणांबाबत चर्चा करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भिवंडी लोकसभा मतदार संघातील प्रशासनात झालेल्या बदलांमुळे जनता खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर नाराज आहे याचे प्रमुख कारण म्हणजे महसूल खात्यातील बदल.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भिवंडी असो शहापूर असो की मुरबाड या सर्वच ठिकाणी प्रशासनाच्या कामकाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसून येतात. तहसील कार्यालय असो प्रांत कार्यालय असो की महसुलाचे इतर कोणते कार्यालय या ठिकाणी न्यायासाठी आलेल्या जनतेला मागील दहा वर्षात न्याय मिळाला नाही, अशी खंत जनतेमधून व्यक्त केली जात आहे. बहुतांशी अपिलांचे निकाल हे चक्क विकत दिले जातात असा आरोप जनतेमधून केला जातो.

कपिल पाटील
योग्य कागदपत्रांच्या आधारे कोणताही निकाल दिले जात नाही. हे खरे तर प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी दिलेले निकाल हे न्यायिक स्वरूपाचे असतात त्यांच्यावर टिपणी करणे योग्य होणार नाही. परंतु जे सत्य आहे ते नाकारताही येणार नाही. सद्यस्थितीत या कार्यालयांमधून निवाडे चक्क विकले जातात त्यामुळे गरीब अशिक्षित शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, असे अनेक निकाल आहेत की ज्याच्या वर चौकशी केली गेली तर खूप मोठा घोळ निर्माण होऊ शकेल तहसील कार्यालयातून "७० - ब" संदर्भात दिलेले निकाल खूपच धोक्याचे आहेत.
 
पीक पाण्याला कोणत्याही स्वरूपाच्या नोंदी नसताना सातबारावर पीक पाणी हा शेरा नसताना किंवा पीक पाण्यासाठी दिलेले कोणतेही अर्ज उपलब्ध नसताना दिलेल्या अर्ध्यांबाबत पंचनामे किंवा चौकशी अशी कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसताना सत्तर ब चे आदेश भिवंडी तसेच इतर तहसील कार्यालयांमधून देखील निर्गमित झाले आहेत. असे आदेश कसे होऊ शकतात असा प्रश्न आहे.मुख्य म्हणजे असे आदेश सुनावणीच्या विशेष तारखा न घेता फक्त दोन ते तीन तारखांच्या आधाराने दिले आहेत. याबाबत प्रांत कार्यालयात अपील केल्यानंतर ते देखील अवघ्या दोन दोन तारखांमध्ये फेटाळल्या गेल्याच्या अनेक गोष्टी घडल्या आहेत.
 
भिवंडी तहसील कार्यालय असो, शहापूर तहसील कार्यालय असो किंवा इतर कोणतीही कार्यालय यांच्यामध्ये दाखल केलेले अपील किंवा चार - चार सहा वर्ष सुरू असतात दोन ते तीन तारखांमध्ये निकाल दिले असे प्रकार यापूर्वी घडलेले पहावयास मिळत नाहीत. परंतु सद्यस्थितीत असे प्रकार घडत आहेत हा प्रकार मागील तहसीलदार गायकवाड यांनी खूप मोठ्या प्रमाणात केल्याच्या नोंदी उपलब्ध आहेत आणि असे निकाल ज्यांना मिळाले आहेत ते चक्क भाजपाचे कार्यकर्ते असल्या लोकांच्या भावना अधिकच भडकले आहेत अशा अधिकाऱ्यांना अभय देण्याचे काम खासदार कपिल पाटील यांनी केले असा आरोप जनतेमधून केला जात आहे किंबहुना असे अधिकारी हे केवल खासदार कपिल पाटील यांचेच ऐकतात असेही म्हटले जाते यामध्ये तथ्य काय ते जनतेलाच माहीत परंतु घडणाऱ्या ह्या प्रकारामुळे कपिल पाटील यांच्या बद्दल अधिक नाराजी पसरली आहे.
 
एक महसूल विभाग असे नाही तर प्रशासनातील सर्वच विभागांची कामकाजाची पद्धत बदलली आहे या बदललेल्या परिस्थितीला शासन आणि भिवंडीतील लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत असा जनतेचा आरोप आहे याचा फटका या निवडणुकीत खासदार कपिल पाटील यांना नक्कीच बसणार आहे.
 
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठाणे जिल्हा परिषदेमध्ये मागील दहा वर्षापासून झालेल्या भ्रष्टाचाराबाबत ही भिवंडी लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण जनता खासदार कपिल पाटील यांना जबाबदार ठरत आहे. ठाणे जिल्हा परिषदेमध्ये अब्जो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. एकच काम वेगवेगळ्या दोन ते तीन लेखा शीर्षामध्ये टाकायचे एका लेखाशीर्षामधील काम करायचे आणि उर्वरित शीर्षामधील कामे न करताच बिले काढायची असा सरस प्रकार ठाणे जिल्हा परिषदेमध्ये घडत आहे.
  
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे भिवंडी शहापूर कल्याण अंबरनाथ आणि काही प्रमाणात मुरबाड तालुक्यात अशा काही ग्रामपंचायती आहेत की ज्यांचे उत्पन्न करोडो रुपये आहे अशा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत निधी मधून कामे केल्याचे दाखविली जाते परंतु प्रत्यक्षात हीच कामे पुन्हा जिल्हा परिषदेतील विविध लेखा शिर्षामधून केल्याचेही दाखविले आहे ग्रामपंचायत मधून प्रत्यक्षात कामे न करता बिले काढली जातात याकरिता पंचायत समिती बांधकाम विभागामार्फत खोटे मूल्यांकन दाखले देण्याचे प्रकार सहजपणे घडत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे आजपर्यंत याबाबत कोणीही आवाज उठवला नाही ज्या कुणी याबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्यांना त्रास देऊन किंवा आर्थिक गुन्हे दाखल करून गप्प बसवण्यात आले आहे.
खरे तर ठाणे जिल्हा परिषद आणि ठाणे जिल्ह्यातील करोडो रुपये उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतींचे क्यागमार्फत चौकशी करावी अशी मागणीही आम्ही केली होती. परंतु ती होईल असे वाटत नाही असं थोडक्यात सांगायचे तर बांधकाम विभाग जिल्हा परिषद ठाणे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत जनता स्थानिक खासदार आणि सत्ताधारी पक्षाचे खासदार म्हणून कपिल पाटील यांना जबाबदार धरत आहेत त्यामुळेच त्यांच्याबद्दल या कारणामुळे देखील मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे या कारणामुळे मतदानावर निश्चितच परिणाम होणार आहे.
 
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीबाबत जनतेची अवस्था माझा गुन्हा म्हणून मी अशी झाली असली तरी मतदानासारखे पवित्र कर्तव्य त्यांना पार पाडायचे आहे आम्ही वर म्हटल्याप्रमाणे दगडापेक्षा वीट मऊ हा पर्याय स्वीकारून जनता मतदान नक्कीच करेल परंतु सद्यस्थितीत या निवडणुकीत कोणाचे पारडे जड आणि कुणाचे पारडे हलके हे सांगणे अत्यंत अवघड आहे सद्यस्थितीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदार नेमके कोणाला उचलणार आणि कोणाला पाडणार हे बोलणे अवघड आहे.
परंतु दहा वर्ष खासदारकी भोगल्यानंतर कपिल पाटील यांच्या बद्दल जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातो. मतदार जेव्हा मतदान करतात तेव्हा त्यांच्या काही अपेक्षा असतात त्या अपेक्षा एकदा नाही तर दोनदा भंग करण्याचे काम कपिल पाटील यांनी केले आहे. मतदारांनी दोन वेळा संधि देऊनही कपिल पाटील यांना मतदारांचे समाधान करणे शक्य झाले नाही याचे प्रमुख कारण मतदारांच्या भल्या पेक्षा त्यांच्या विकासापेक्षा कपिल पाटील यांना स्वतःचा विकास अधिक महत्त्वाचा वाटला हेच आहे त्यामुळेच जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल चीड निर्माण झाले आहे.
याउलट बाल्या मामा किंवा निलेश सांबरे हे पहिल्यांदाच लोकसभेसाठी आपले नशीब आजमावत आहेत इतर बाबतीत त्यांच्याबद्दलची नाराजी असली तरीही लोकसभा किंवा विधानसभा यांना आत्तापर्यंत संधी दिलेली नसल्यामुळे ह्या दोन उमेदवारांच्या बद्दल मतदारांमध्ये थोडासा सॉफ्ट कॉर्नर असल्याचे दिसून येते आम्ही मागे म्हटल्याप्रमाणे दगडापेक्षा वीट मऊ या म्हणीप्रमाणे जनता विचार करू शकते ते करेलच असे म्हणता येणार नाही पण काही औषध या दोन्हीपैकी कुणाला संधी द्यावी असा विचार जनतेमधून होण्याची शक्यता आहे.
परंतु यानिमित्ताने असा एक प्रश्न निर्माण होतो की दोन टर्म खासदारकी उपभोगणारे आणि ठाणे जिल्ह्यातून प्रथमच केंद्रात मंत्रीपद उपभोगणारे कपिल पाटील यांच्या बद्दल जनतेत असलेल्या नाराजीचे नेमके काय कारण आहे कोणतीही व्यक्ती एखाद्या पदावर बसल्यानंतर जनता त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करीत असते या सर्वच अपेक्षा पूर्ण होतील असे नाही पण त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जरी संबंधित व्यक्तींनी प्रयत्न केले तरी त्याच्या मधून जनतेचे समाधान होते परंतु भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही असा आरोप जनतेमधून त्यांच्यावर लादला जातो यामध्ये सत्यही खूप मोठ्या प्रमाणात आहे जनतेच्या मनाचा विचार करण्यापेक्षा कपिल पाटील नेहमीच स्वतःच्या मनाचा विचार करून काम करत असल्याचे दिसून आले आहे.
 
बहुतांशी अपिलांचे निकाल हे चक्क विकत दिले जातात....!
 
कपिल पाटील यांना स्वतःचा विकास अधिक महत्त्वाचा वाटला, त्यामुळेच जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड चीड निर्माण झाले आहे.....!