भिवंडी लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला.

जनदूत टिम    18-May-2024
Total Views |
कपिल पाटलांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बाळ्या मामांना राष्ट्रवादीत पाठवले..??
 
 
भिवंडी लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे सोमवारी लोकसभेसाठी मतदान होणार आहे, मात्र तत्पूर्वी मतदारसंघात प्रचंड खलबल निर्माण झाले आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते बाल्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांचा प्रचार करत असल्याचे दिसत आहे.

kapil patil
 
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तर महा गटबंधनांमध्ये आहेत. परंतु एकनाथ शिंदे यांची शिवसेना युतीमध्ये असल्याने त्यांनी कपिल पाटील यांचा प्रचार करणे आवश्यक आहे. किंबहुना शंभर टक्के त्यांचे काम करणे आवश्यक आहे, मात्र निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात निवडणुकीला एक वेगळे वळण लागले असून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या बाल्या मामां यांच्या मागे उभे असल्याचे चित्र दिसू लागले आहे. याबाबत सखोल चौकशी केले असता काही धक्कादायक माहिती उजेडात येत आहे. बाल्या मामा यांचा प्रचार करणारे काही कार्यकर्ते आम्हाला वरून आदेश आहे. त्याचेच आम्ही पालन करीत आहोत असे सांगताना दिसतात असे घडण्यासाठी नेमके कारण काय याबाबत चर्चा करणे आवश्यक आहे.
मागील दहा वर्षापासून कपिल पाटील भारतीय जनता पार्टीचे भिवंडी लोकसभेचे खासदार आहेत. त्यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे प्रशासनामध्ये ठाणे जिल्ह्यात बदल करताना त्यांना विचारल्याशिवाय कोणताही बदल करता येत नाही असे उजेडात आली आहे.
 
ज्या अधिकाऱ्यांची बदली कपिल पाटील यांना हवी आहे. त्या बदलीला अगदी मुख्यमंत्रीही नाकारू शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये कपिल पाटील यांचा मोठा हस्तक्षेप असल्याचे बोलले जाते त्याकरिता ते त्यांच्या मर्जीप्रमाणेच काम करत असतात दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे विकास कामांना निधी देताना देखील त्यांच्या मर्जीप्रमाणेच निधी वाटप करावे लागत आहे.

mhatre
 
आमदारांनी कितीही ओरड केली तरी त्यांच्या मताप्रमाणे निधीचे वाटप देखील केले जात नाहीत एकंदरीत सांगायचे तर कपिल पाटील यांची प्रचंड आरेरावी कामकाजामध्ये दिसून येत आहे. कपिल पाटलांच्या या कार्यपद्धतीला प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील वैतागले असल्याचे बोलले जाते दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेना एकनाथ गट यांचे कार्यकर्ते देखील कपिल पाटील यांच्या कार्यपद्धतीला अत्यंत वैतागले होते. त्यांचे काम करण्यास कोणीही तयार नव्हते परंतु इथे धर्म म्हणून वरून तरी आपण काम करीत असल्याचे दाखवणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेऊन एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावले होते परंतु ते सर्व वर - वर असल्याचे बोलले जाते मुळातच बाल्या मामा हे देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटामध्ये सहभागी होते भिवंडी लोकसभेत शिवसेनेला जागा मिळणार नाही हे माहीत असल्याने आणि कपिल पाटील यांना शह देणारा चांगला माणूस कोण हे शोधून एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाठवल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी मधून त्यांना तिकीट मिळेल ही बाब फायनल करूनच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाठवल्याचे बोलले जाते.
 
आणखी महत्त्वाची बाब म्हणजे जर कपिल पाटील या निवडणुकीत निवडून आले तर ते पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ शकतात परंतु एकनाथ शिंदे यांना आपल्या मुलासाठी मंत्रिमंडळात स्थान निर्माण करायचे आहे. जर ठाणे जिल्ह्यात एक दोन खासदारांचा मंत्रिमंडळात समावेश होणे अशक्य बाब आहे. जर कपिल पाटील पराभूत झाले तर श्रीकांत शिंदे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते ही बाब देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दोन कारणांसाठीच कपिल पाटील यांना निवडणुकीत पराभूत करणे अत्यंत आवश्यक आहे ही बाब एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला माहीत असल्यामुळे त्यांना पाडण्यासाठी फिल्डिंग लावणे अत्यंत आवश्यक आहे.
 
याचा विचार करून आतून शिवसैनिकांना आणि कार्यकर्त्यांना बाल्या मामांच्या पाठीमागे उभे राहण्यास सांगण्यात आले आहे. कपिल पाटील यांच्यासाठी ही बाब अत्यंत धोकादायक आहे असे म्हणायला हरकत नाही.