" फास्ट टॅग द्वारे, जबरन टोल वसुली."

मुंबई अहमदाबाद महामार्ग NH48 म्हणजे " NHAI साठी कलंक आहे."

जनदूत टिम    17-Feb-2024
Total Views |
 मुंबई :- पालघर
 
 
" फास्ट टॅग द्वारे, जबरन टोल वसुली."

 
पालघर :- मुंबई अहमदाबाद महामार्ग NH48 म्हणजे " NHAI साठी कलंक आहे."
 
 
पहिले चार पदरी रोड बनवून टोल वसुली केली,. मग साहपदरी बनवून टोल वसुली झाली. ( काही ठिकाणी अजून ही चार पदरी )
आणि आता म्हणे " व्हाईट टोपिंग " केल्याने अपघात कमी होणार...."( माननीय सुप्रीम कोर्ट म्हणते खराब रस्त्यावर टोल वसुली अन्यायकारक आहे")
 
मुंबई अहमदाबाद महामार्ग NH48 
... मग अपघात हे रोड वरील खड्ड्यात वाहने आदळून होत होते हे खरं आहे,..... की वाहन चालक आती वेगाने वाहने चालवतात म्हणून अपघात होतो...हे खरे आहे..?
.... रोड ची गुणवत्ता सिमेंट काँक्रिट केल्याने वेग वाढणार, मग वाहने अतिवेगाने चालणार, आणि अजून मोठे, समृद्धी सारखे अपघात घडणार ( असे घडू नये हीच प्रार्थना ) मग परत नवीन टेकनॉलॉजी येई पर्यंत....... गतिरोधक किंवा रेम्बलर मारून गती नियंत्रित करण्यासाठी नवीन उठाठेव... नवीन टेंडर.....
अपघातांचे मुळ कारण " ब्लॅक स्पॉट आहेत " हे सत्य माहित असताना, अशी ठिकाणे चिन्हित झाल्यावर.. व्हाईट टोपिंग करताना असे अपघात प्रवण क्षेत्र दुरुस्त करणे क्रमप्राय आहे, आणि मेंढवण, चारोटी असे प्रचंड मोठे अपघात प्रवण क्षेत्र दुर्लक्षित करून, मुद्दाम तातडीने अश्या ठिकाणी रात्र न दिवस काम सुरु आहे. फक्त सिमेंट चा थर दिल्याने अपघात कमी होणार असतील तर हे काम आधीच का नाही केले..? हकनाक निर्दोष लोक जीवाला मुकले, परिवार उद्धवस्त झाले.....
"मेंढवन घाटातील सदोष वळणे दुरुस्त न करता व्हाईट टॉपिंग ची अति घाई का होत आहे..."? आणि NHAI अधिकाऱ्यांनी दुरुस्ती साठी चा प्रस्ताव का मंजूर करून घेतला नाही...?
टोल बंद....
......."जो पर्यंत व्हाईट टॉपिग पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल "वसुली अन्याय कारक आहे."
असे ही या पैकी, एक टोल नाका मा. मंत्री गडकरीजी यांच्या वक्तव्यानुसार अनधिकृतच आहे..

 मुंबई अहमदाबाद महामार्ग NH48
 
* दहिसर ते खानिवाडे टोल मधील अंतर 36 किलोमीटर
* खानिवाडे ते चारोटी (घोळ)
टोल नाक्या मधील अंतर 47 किलोमीटर आहे.
पालघर जिल्ह्यातील जनतेवर हा जाझीया कर लादला आहे. गुजरात मधे मात्र, नियमानुसार आहे.
पुढील अठरा महिने हे व्हाईट टॉपिग होताना अजून किती जणांना बळी द्यावा लागणार..कारण नियोजन शून्य कारभार आहे, कामगारांचे जीव पण धोक्यात टाकून काम सुरु आहे... वाहतूक कोंडी ची समस्या रोजची आहे, वाहतूक पोलीस अतिरिक्त कामाच्या ताणामुळे, रहदारी नियोजन करताना आजारी पडत आहेत.
कामाचा दर्जा, रहदारीचे नियोजन, कर्मचाऱ्यांना सुरक्षा, दुर्घटना ग्रासताना मदत हे सर्व काही राम भरोसे आहे.
एकंदरीत सामाजिक जीवनावर आणि आर्थिक नुकसान होताना , जनतेच्या सहनशीलतेचा अंत होण्याची प्रतीक्षा ठेकेदार,अधिकारी यांनी करू नये.
महामार्गांवर वाहतूक कोंडीत, रुग्णवहीका, लहान मुलांना घेऊन प्रवास करणारे परिवार, शाळेतील मुले, कर्मचारी, डॉक्टर, दूध वाहक वाहने, ऑक्सिजन ची वाहने आणि अतिशय घातक रासायनिक, गॅस, केमिकल ची वाहने तासंतास अडकून पडतात, अस्यावेळी मोठी दुर्घटना घडल्यास मदत कशी पोहोचणार...?????
मा. खासदार, मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी वारंवार केलेल्या सूचना चे पालन होताना दिसत नाही. कारवाई केल्याशिवाय काही सुधारणा अपेक्षित नाही...
आग लागल्यावर विहीर खोदणार....