मुंबई ते भिवंडी रोड स्टेशन लोकल रेल्वे सुरु करण्याची शिवसेनेची मागणी !

08 Aug 2023 10:09:58
Thane : Bhiwandi ; 
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात असलेल्या सायझिंग, डाईंग, पाॅवर लुम, मोती कारखाने, जिन्स तयार करणारे कारखाने, होलसेलर, दुकानदार आणि विविध व्यवसायाचे व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी यांचा विचार करता या सर्वांची नाल मुंबईशी जोडली गेल्यास तालुक्याचा विकास झपाट्याने होऊ शकेल.

मुंबई ते भिवंडी रोड स्टेशन लोकल रेल्वे सुरु करण्याची शिवसेनेची मागणी 
 
यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते भिवंडी रोड स्टेशन व्हाया दिवा अशी लोकल ट्रेन दर तासाला सुरु केल्यास जनतेची सोय होण्याबरोबरच रेल्वेलाही चांगल्याप्रकारे महसूल मिळू शकते असा विचार करुन शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) डॅशिंग भिवंडी शहरप्रमुख प्रसाद भाई पाटील यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अजय मिश्रा यांची मुंबई येथील कार्यालयात भेट घेऊन लवकरात लवकर लोकल ट्रेन सुरु करण्याची विनंती केली.

मुंबई ते भिवंडी रोड स्टेशन लोकल रेल्वे सुरु करण्याची शिवसेनेची मागणी 
 
भिवंडी शहर आणि ग्रामिण हा फार मोठा विस्तीर्ण विभाग आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा गोडाऊन पट्टा भिवंडी ग्रामीण मध्ये आहे. तसेच देशातील सर्वात मोठा कापड उद्योग भिवंडी शहरातून केला जातो. भिवंडी शहराला मँचेस्टर म्हणूनही संबोधले जाते. शिवाय नोकरी धंद्यासाठी चाकरमनी रोजच मुंबईशी जोडले गेले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थी शिक्षणासाठी मुंबईला ये-जा करीत असतात. तसेच शेकडो सायझिंग, डाईंग भिवंडी तालुक्यात असून सर्वांनाचा मुंबईशी संपर्क करावा लागतो. १५ ते २० लाख लोकसंख्या असलेला भिवंडी तालुका राजकीय नेत्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव आणि उदासिनतेमुळे दुर्लक्षित आणि मागासलेलाच राहिलेला आहे.
 
भिवंडी तालुक्याची नाल लोकल रेल्वेच्या माध्यमातून मुंबईशी जोडली गेल्यास भिवंडीचा झपाट्याने विकास होण्याबरोबरच रेल्वे प्रशासनालाही चांगल्याप्रकारे महसूल मिळू शकतो. हाच विचार करुन शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) डॅशिंग भिवंडी शहरप्रमुख प्रसाद भाई पाटील यांनी थेट मध्य रल्वेचे महाप्रबंधक अजय मिश्रा यांची भेट घेऊन भिवंडी तालुक्याची सविस्तर माहिती सांगून लवकरात लवकर लोकल रेल्वे सुरु करण्याची विनंती केली. अजय मिश्रा यांनी तात्काळ याबाबत माहिती घेण्याचे आदेश दिले. आणि रेल्वेचा फायदा होणार असेल तर आम्ही नक्कीच यासाठी प्रयत्न करु. रेल्वे लोकांच्या सेवेसाठीच आहे असे त्यांनी यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळास सांगितले.
 
शहरप्रमुख प्रसाद भाई पाटील लवकरच शिवसेनेचे खासदार तथा सचिव मा. ना. विनायकजी राऊत साहेब यांची भेट घेऊन दिल्ली येथील रेल्वे प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शिवसेनेच्या या प्रयत्नांना यश आल्यास भिवंडी तालुक्यातील जनतेची फार मोठी सोय होऊ शकेल. आजच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळात शहर सचिव महेंद्र कुंभारे, विधानसभा संघटक उमेश कोंडलेकर, विधानसभा सचिव गोकुळ कदम, सहसचिव संतोष भावार्थे उपस्थित होते.
महेंद्र कुंभारे, शिवसेना शहर सचिव, भिवंडी.
Powered By Sangraha 9.0