ठाणे : इसीस कनेक्शन; पडघातून एका संशयितास अटक...

05 Aug 2023 17:24:07
Bhiwandi : Padagha ;

पडघातून एका संशयितास अटक 
 
पुण्यातून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून एटीएस पथकाने एका आरोपीला अटक केली आहे. झुल्फिकार अली बडोदावाला (रा. पडघा, ता. भिवंडी, जिल्हा, ठाणे) असे एटीएस पथकाने ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. बडोदावाला यास 3 जुलै 2022 रोजी एनआयएने अटक केली होती. तेव्हा पासून तो एनआयएच्या कोठडीत होता.
 
दहशतवादी संघटना असलेल्या इसीस मध्ये तरुणांना भरती करण्याची जबाबदारी असलेल्या एका डॉक्टरास एनआयएने पुण्यातील कोंडवा परिसरातून काही दिवसांपूर्वी अटक केली होती. तर यापूर्वी एनआयएने भिवंडी तालुक्यातील पडघा येथून एका संशयित तरुणास ताब्यात घेतले होते. तो मुख्य सूत्रधार असलेल्या डॉक्टराचा साथीदार आहे.
 
झुल्फिकार अली बडोदावाला असे पडघातून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याच संशयित आरोपीस आता राज्य दहशतवादी पथकाने ताब्यात घेतले आहे. न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे असे एटीएस सूत्रांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0