शहापूर सरकारी कार्यालयामध्दे रक्षाबंधन केला साजरा...

जनदूत टिम    31-Aug-2023
Total Views |
Thane : Shahapur ; 
शहापूर पोलिस स्टेशन व तहसील कार्यालया मध्दे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आनंदात साजरा करण्यात आला.

शहापूर सरकारी कार्यालयामध्दे रक्षाबंधन केला  साजरा 
 
गेल्या 8वर्षापासून सर्वपक्षीय महिलांना सोबत घेऊन एक सामाजिक बांधिलकी व स्नेहभाव जपत हा सोहळा साजरा करत असतो.
पोलिस म्हणजे समाजाचे रक्षणकर्ते. कधीही कोणीही साद घातली तरअसेल त्या परिस्थितीत ते आपल्या साठी नेहमीच हजर असतात. त्यांच्या प्रती एक आदर सन्मान जपत 8वर्षापासून हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
 
ह्या वेळी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अपर्णा खाडे, काँग्रेसच्या ठाणे जिल्हा ग्रामीण महीला अध्यक्षा जान्हवी देशमुख, वसुंधरा संजिवनी मंडळाच्या किशोरी प्रकल्प प्रमुख कविता पडवळ, काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा संध्या पाटेकर, व उपाध्यक्षा माया मगर, वासिंद काँगेस शहर अध्यक्षा ज्योती परदेशी, वसुंधरा मंडळाच्या सुप्रिया यादव, धनश्री पाठारी , डोळखांब उपसरपंच उज्वला सांबरे ह्या हजर होत्या.