Maharashtra : Nandakar ;
नांदकर गावातील सर्व नागरिकांना अत्यंत महत्वाची सुचना . आपल्या गावातील नांदकर गावातुन अटाळी आम्बिवली रेल्वे स्टेशनला जाण्या करिता आपण आपल्या भातसा काळु नदी पार करावी लागते .त्या करता पुल नाही पर्याय मार्ग म्हणजे ,नाय विलाज त्या करीता आपण नांदकर अटाळी असा प्राण घातक होडीचा प्रवास करतो. हा प्रवास कधीही कुठलया नागरीकांना होडीतुन ये जा करीता ध्यानी मनी नसताना प्राण घातक ठरु शकतो ,हे सत्य आज मी माझ्या समक्ष डोळ्यांनी मी स्वता नांदकर हुन आम्बिवली मार्ग जात असताना आज सकाळी १० ची होडी पकडण्यासाठी होडी वर पोहचलो.
तर मोठा होडी दुरुस्ती कामा करता बंद होती. लहान होडुतुन नागरीक व महिला यांचा जीव घेणे प्रवास फायबर होडीतुन तीन चार माणसे घेऊन चालु होता.मी सकाळी बरोबर १० वाजता माझ्या समोर म्हणजे अगदी तीन फुटांवर चार महिला घाईगडबडीत रेल्वे गाडी पकडण्यासाठी होडीत बसल्या होत्या त्यात तीन कोळी वाड्यातील महिला होत्या त्या सोबत एक पहुणी म्हणुन आलेली महिला होती. फायबर लहान होडीत खरं तर दोन महिला व दोन पुरुष असा प्रवास तो पण वर दांडीवर न बसता होडीत खाली बसुन करावा लागतो. तर तो जिवघेणा धोके दायक प्रवास यशस्वी होऊन नदीपार होतो.
परंतु आज माझ्या समोर होडी वाल्यांची मनाई असताना चार महिला होडीत बसल्या व एक पाहुणी महिला होडीत नव्यानेच प्रवास करत असताना तिला फायबर होडीत व्यवस्थित ताल मेलात होडी मध्ये भयभीत न होता बसता येत नव्हती त्यात ती महिला नंतर कसी बशी बसली परंतु होडी चालु झाल्यावर मध्ये हि महिला नक्की गडबड करुन,फायबर होडीचा बॅयलएस बिघडु शकते हि गोष्ट बाब माझ्या तात्काळ लक्षात आली ,म्हणुन मी होडी चालु होणया अधी त्या महिलेला व इतर महिलांना सांगितले व्यवसिथीत आता बॅयलएस मध्ये बसल्या आहेत तशाच बसा होडी चालु झाल्यावर मधेच काही गडबड करु नका. त्या नंतर एक दोन सेकंदात त्या महिलांनी होडीत बसल्यावर इकडे तिकडे हालचाल केली त्या मुळे होडी चालु होणया अधीच किनारा लगत होडी पलटी झाली त्यामुळे एक महिला नदीत बुडाली तिला तात्काळ एकाने हाताने पकडुन व होडी वाला विकी यांनी स्वताचा जीव धोक्यात घालुन वाचविले. ह्या घटने मध्ये होडी चालक यांची काही चुक नव्हती त्यांनी मनाई केल्यावर हि चार महिला होडुतुन प्रवास करत होत्या.या घटनेचा मी मी प्रत्येकक्ष साक्षीदार आहे.
तरी आज उद्या मोठी होडी दुरुसत होई पर्यंत नांदकर होडी बंद ठेवण्याचा आग्रह मी होडी चालक यांस केला .सुदैवाने आज चार महिन्यांवर वेळ आली होती परंतु इक्ष्वर कृपेने वेळ आली नव्हती. म्हणुन उधा रक्षाबंधन व कोळी समाजाचा वर्षातील महत्वाची सण नारळी पौर्णिमा आहे. उद्या सकाळी आपल्या नदी मध्ये नारळ सोडुन नद्यांची पुजा करुन व गावातील सर्व देवांच्या कृपेने आज मोठी होणारी दुर्घटना टळली आहे. त्यामुळे उद्या गावातील सर्व जागृत देवस्थान यांच्याही पुजा करुन त्यांना नारळ हार अर्पण करुन नंतर मोठी होडी चालु होईल. यांची नांदकर गावातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी ,व आजच्या दुर्घटनेची दखल घेऊन लहान होडी चालु करण्याचा आग्रह कोणी ही नागरीकांनी करु नये अशी माझी सर्व नागरिकांनी कळकळीची विनंती आहे.
महिलांनी तर मोठा होडी बंद असल्यावर लहान फायबर होडीत तर प्रवास करुच नये .अशी माझी नांदकर गावातील सर्व महिलां आई बहिणी ना विनंती आहे...हि माहिती गावातील सर्व ग्रुप वर तात्काळ शेर करा. व कल्याण.बापगाव नांदकर अश्या मार्गाचा दोन दिवस वापर करा. कारण आपल्या महत्वाच्या कामा पेक्षा आपला जीव केव्हा ही महत्वाचा आहे.हे सर्वांनी लक्षात घ्यावा .घटनेची सविस्तर माहिती रात्री मिळेल. एक मिडिया रिपोर्ट पत्रकार असुन समक्ष जीव घेण्या घटनेचा मी व्हिडीओ काढु शकलो नाही.
कारण माझ्या दृष्टीने एक प्रामाणिक पत्रकार म्हणुन व्हिडीओ काढण्यापेक्षा इतर होडीतील तीन महिलांचे जीवन वाचविणे व बुडालेला महिलेला पण सुखरुप पाण्याबाहेर काढण्यासाठी मदत करणे महत्वाचे होते .व त्यावेळी होडी वाल्यांच्या पण खंबीर पणे पाठीशी राहाणे महत्वाचे होते कारण त्या घटनेत त्याची काही चुक नव्हती तरी पण काही विपरीत घटना घडली असती तर सर्व बिल त्यांच्यावर फाटला असता सर्व जनांनी उगाच त्यांना दोषी ठरविले असते. महिलांनी तर आज घटनेची दखल घेऊन कधीच लहान फायबर होडीतुन प्रवास करु नये.