ISRO मध्ये असलेले हजारो शात्रज्ञ येतात कोणत्या संस्था/कॉलेज मधून ?

प्रमोद कुलकर्णी, पुणे.    28-Aug-2023
Total Views |
India : ISRO ; 
चांद्रयान ३ च्या यशानंतर इसरोवर आणि त्यातील शात्रज्ञ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ते योग्यच आहे. अंतराळात यान पाठवणे, यान चन्द्र किंवा एखाद्या ग्रहावर उतरवणे या गोष्टी कल्पनेपलीकडील अत्यन्त अवघड, गुंतागुंत असलेल्या असतात हे आपण सर्वजण जाणतो. या मोहिमांमध्ये हजारो इंजिनिअर, शास्त्रज्ञ अहोरात्र राबलेले असतात. हे सगळे येतात कोणत्या संस्था/कॉलेज मधे शिकून हा प्रश्न अनेकांना पडला असेल.

ISRO मध्ये असलेले हजारो शात्रज्ञ येतात कोणत्या संस्था कॉलेज मधून
 
ही माहिती देण्यासाठीच हे लिखाण.
यातील फक्त २ टक्के IIT/NIT येथून येतात हे वाचून आश्चर्य वाटेल.
हे शास्त्रज्ञ येतात ते थीरुअनंतपुरम येथे असलेल्या Indian Institute of Space Science and Technology (IIST) या कॉलेज मधून. Deemed University असलेले हे स्वायत्त कॉलेज Department of Space, Government of India यांच्या कक्षेत येते. या कॉलेजची स्थापनाच अंतराळ संशोधन, इसरो साठी तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी झाली आहे.
 
या क्षेत्रातील विविध शाखांमध्ये B. Tech/M. Tech/Ph. D. शिक्षणाची सोय येथे आहे.
येथून पदवीधर होणारे तरुण इसरो व अन्य अंतराळ संशोधन आस्थापनात अग्रक्रमाने घेतले जातात. इथे पदवीधर झाल्यावर first right to employ हा इसरोचा असेल हे आधीच लिहून घेतले जाते. इसरोने नाही म्हणले तरच इथला पदवीधर अन्यत्र नोकरी करू शकतो. अशी अट ठेवण्याचे कारण इसरो कडून पूर्ण तांत्रिक साहाय्य कॉलेजला मिळते. थोडक्यात इथे पदवी घेतली की इसरोत नोकरी पक्की!
 
सरकारी कॉलेज असल्याने अन्य इंजिनिअरिंग कॉलेज पेक्षा येथे फी माफक आहे. प्रवेश JEE परीक्षेवर वर असतो.
या कॉलेजची माहिती बहुदा फार जणांना नसावी. आजपर्यंत मी या कॉलेजला जाणार असे म्हणणारा आपल्या भागात कोणी पहिला नाही. दक्षिण भारतात हे कॉलेज माहीत असावे. त्यामुळेच इसरोत दक्षिण भारतीय जास्त असावेत.
हे सर्व मी मुद्दाम माहितीसाठी लिहीत आहे. संशोधक, शास्त्रज्ञ सर्व भारतातून तयार झाले पाहिजेत. आज फक्त अभिनंदनाचा वर्षाव हे तात्पुरते झाले. आपल्या पुढच्या पिढीत या कॉलेजला जाणारी मुले मुली असायला हवीत.
अंतराळ संशोधन क्षेत्र वाढत आहे.
 
अधिक माहितीसाठी कॉलेजची वेबसाईट iist.ac.in पहावी.
माहिती उपयुक्त ठरेल असे वाटते.
कृपया जास्तीत जास्त पुढे पाठवावे ...