इतिहास रचला ! Neeraj Chopra सह ३ भारतीय फायनलमध्ये !

रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये गोल्ड मेडलसाठी India vs Pakistan असा सामना होणार आहे.

जनदूत टिम    25-Aug-2023
Total Views |
World Athletics Championship -
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) सह डी.पी. मनू आणि किशोर जेना यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारातील अंतिम फेरीत प्रवेश केला. 
 
  
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) सह डी.पी. मनू आणि किशोर जेना यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारातील अंतिम फेरीत प्रवेश केला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत प्रथमच भालाफेकीच्या फायनलमध्ये तीन भारतीय सहभागी होणार आहेत. नीरज ८८.७७ मीटर सह अव्वल स्थानावर राहिला, तर मनू ( ८१.३१ मी.) व किशोर ( ८०.५५ मी.) हे अनुक्रमे ६ व ९ व्या क्रमांकावर राहिले. अव्वल १२ खेळाडू फायनलसाठी पात्र ठरले. रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये गोल्ड मेडलसाठी India vs Pakistan असा सामना होणार आहे. कारण, पाकिस्तानचा अर्शद नदीमने ८६.७९ मीटरसह दुसरे स्थान पटकावले आहे.
 
  • एकच वार, सारे गार! नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात फायनल अन् ऑलिम्पिक तिकीट केलं पक्कं

Neeraj Chopra सह ३ भारतीय फायनलमध्ये 
 
क्वालिफिकेशन ए मध्ये नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ मीटर लांब भाला फेकून अंतिम फेरीतील जागा पक्की केली. यासह त्याने २०२४ मध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचेही ( पात्रता मार्क - ८५.५० मीटर) तिकीट पटकावले. भारताच्या डी. पी. मनूने पहिल्यात प्रयत्नात ७८.१० मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात ८१.३१ मीटर लांब भाला फेकला. ८३.०० मीटर हा पात्रता मार्क होता अन् नीरजने पहिल्याच प्रयत्नात सर्वात लांब भाला फेकला. जर्मनीच्या ज्युलियन वेबर ८२.३९ मीटरसह दुसरा राहिला, तर मनू ८१.३१ मीटरसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. ''लंडन वर्ल्ड चॅम्पियनशीपमधून मी शिकलो आणि येथे पहिल्याच प्रयत्नात क्वालिफायन होण्याचा निर्धाराने उतरलो,''असे नीरजने म्हटले.

Neeraj Chopra सह ३ भारतीय फायनलमध्ये 
 
क्वालिफिकेशन बी मध्ये झेक प्रजासत्ताकच्या जाकूब व्हॅड्लेजने दुसऱ्या प्रयत्नात ८३.५० मीटरचे अंतर पार करून फायनलची पात्रता निश्चित केली. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना ८१.८३ मीटर भाला फेकला. भारताच्या किशोर जेनाने पहिल्या प्रयत्नात ८०.५५ मीटर भाला फेक केली. अर्शदने त्याच्या तिसऱ्या प्रयत्नात ८६.७९ मीटर लांब भालाफेक करून अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. यासह त्याने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही पटकावले.

Neeraj Chopra सह ३ भारतीय फायनलमध्ये 
 
किशोरचा तिसरा प्रयत्न अपयशी ठरल्याने त्याला इतरांच्या कामगिरीवर अलवंबून रहावे लागले आणि नवव्या स्थानासह तो पात्र ठरला.

Neeraj Chopra सह ३ भारतीय फायनलमध्ये