जिजाऊतर्फे पालघरात कोकण वर्षा मॅरेथॉन 2023 चे आयोजन...

एक धाव उज्ज्वल भविष्यासाठी...

जनदूत टिम    22-Aug-2023
Total Views |
Maharashtr : Palghar Konkan
 
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्य व पालघर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन आयोजित कोकणातील सर्वात मोठी स्पर्धा ‘कोकण वर्षा मॅरेथॉन 2023’ पालघरातील विक्रमगडमधील झडपोली बसस्टॉप येथे 27 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 7 वाजता पार पडणार आहे.
 
एक धाव उज्ज्वल भविष्यासाठी
 
या स्पर्धेची यंदाची थिम ‘एक धाव उज्ज्वल भविष्यासाठी...’ अशी असून कोकण पट्टयात हजारो खेळाडू यावेळी सहभाग नोंदवतील, असा विश्वास आयोजन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी व्यक्त केला आहे. 14 वर्षे वयोगट ते तरुण वर्गापर्यंत मुले-मुली या स्पर्धेत सहभागी होवू शकतात.जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून ठाणे, पालघर आणि तळकोकणापर्यंत विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांसह क्रीडा स्पर्धांमध्येही कोकण अव्वल क्रमांकावर असावे या हेतून ‘एक धाव उज्ज्वल भविष्यासाठी...’ ही थिम वापरत यंदाही 8 व्या वर्षी ‘कोकण वर्षा मॅरेथॉन 2023’चे आयोजन करण्यात आले आहे.
 
या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांमध्ये मुले - 4 कि.मी - 14 वर्ष वयोगट, 6 कि.मी - 17 वर्ष वयोगट, 10 कि.मी - 19 वर्ष वयोगट तर मुलींमध्ये 3 कि.मी - 14 वर्ष वयोगट, 4 कि.मी - 17 वर्ष वयोगट, 6 कि.मी - 19 वर्ष वयोगट तसेच खुला गट: पुरुष - 21 कि.मी, महिला (18 वर्षावरील) - 10 कि.मी. असा असणार आहे. प्रवेश अर्जाची अंतिम तारीख : 25 ऑगस्ट 2023 असून भरघोस बक्षिसांची लयलुटही यावेळी करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- विनोद भोईर 9960220246, राजू देसले 9545182395, अरविंद ठाकरे 9209535434, अजित सांबरे 9270258253, अशोक मोरे 7773915271, अरविंद देशमुख, 7083454777, दिनेश म्हात्रे 9730905750, अमर पष्टे 7507110117 तसेच प्रवेश अर्जासाठी : पुढील लिंकवर क्लिक केल्या प्राप्त होतील. https://forms.gle/9jqyJCDnLd7nCJEc9