महाड शहरांतील जुगार,अवैद्य धंद्यांवर कारवाईची मागणी...

बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई न केल्यास 22 ऑगस्ट पासून शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा !

मिलिंद माने    21-Aug-2023
Total Views |
Raigad: Mahad;
महाड शहरांमध्ये व तालुक्यामध्ये गेल्या कांही महिन्यांपासून रायगड जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या आदेशा वरुन जुगार तसेच अन्य बेकायदेशीर धंद्यांवर कडक कारवाई करण्यात आल्यानें कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणा मध्ये आणण्यात प्रशासनाला यश आले होते. परंतु गेल्या कांही दिवसा मध्ये महाडसह शहर सह तालुक्यात जुगार, अवैद्य धंदे सुरु झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. येत्या 22 ऑगस्ट पर्यंत हे अवैध धंदे बंद न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख चेतन पोटफोडे यांनी महाड शहर पोलिसांना तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

महाड शहरांतील जुगार,अवैद्य धंद्यांवर कारवाईची मागणी 
महाड मध्ये शहराच्या मध्यवर्ती वसाहती मध्ये खुले आम सुरु असणाऱ्या जुगार आणि अवैद्य धंद्यावर का कारवाई केली जात नाही असा सवाल नागरिकांमधून उपस्थित झाला आहे. महाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी काळे यांनी बेकायदेशीर जुगार,मटका धंद्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

महाड शहरांतील जुगार,अवैद्य धंद्यांवर कारवाईची मागणी 
रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशा वरुन जिल्ह्यांतील शहरी त्याच बरोबर ग्रामिण भागांतील कायदा आणि सुव्यस्था राखण्या करीता कांही महत्वपुर्ण निर्णय घेतले आहेंत. त्यामध्ये बेकायदेशी धंदे पूर्णपणे बंद करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले आहेत,असे असताना जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाचे पालन होत नसल्याचे दिसुन येते.
महाड शहरात तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागात जुगार, . मटक्याचे अवैध धंदे व्हिडिओ गेम सारख्या अवैध धंदे बाजारपेठेत व भर वस्ती खुलेआमपणे सुरू आहेत ज्या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी व महिला जातात त्याच रस्त्यांवर अवैधरित्या खुलेआम पणे चालू असणाऱ्या मटका जुगार यांना प्रतिबंध करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख चेतन पोटफोडे यांनी महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे व उपाध्यक्ष काळे यांना आज लेखी निवेदनाद्वारे इशारा देऊन हे धंदे तातडीने बंद न झाल्यास बाविस्ट ऑगस्ट 2023 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे महाड शहर पोलीस ठाण्यावर तीव्र आंदोलन चढण्याचा इशारा दिला आहे.
 
एकवीसाव्या शतकाकडे वाटचाल केली जात असताना तरुण पिढी मध्ये झटपट श्रीमंत होण्या करीता सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात असल्याचे दिसुन येते. जुगार, बेकायदेशीर धंदे, सोशल क्लब या गोंडस नावाखाली चालविण्यांत येत असलेले जुगाराचे क्लब इत्यादी धंद्यांतुन पैसे कमविण्याचा प्रयत्न होत आहे. महाड शहरांमध्ये गाडी तळ परिसरांमध्ये बंद असलेल्या दुकानाच्या गाळ्यांमध्ये खुले आम जुगाराचे धंदे सुरु असल्याने स्थानिक नागरिकांना त्याच बरोबर महिलांना त्रास होत असल्याने त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. मटका, ऑन लाईन जुगार त्याच बरोबर पत्त्याचा जुगार अश्या धंद्याचे आकर्षण तरुणांमध्ये असल्याने काही समाजकंटक त्याचा गैर फायदा घेत आहेत. या धंद्यांमुळे अनेक तरुणांचे जीवन उध्वस्थ होत आहे. अनेक कुटूंबांचे संसार रस्त्यावर आले आहेंत.
 
राज्या मध्ये पोलिस विभागांतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असताना त्याचे परिणाम ग्रामिण भागा पर्यत पोहोचलेले आहेत, स्थानिक पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्या करीता जुगार,मटका इत्यादी अवेैद्य धंद्यावर कारवाई कडक कारवाई करण्ंयात यावी अशी मागणी नागरिक करीत . असताना महाड शहर पोलीस ठाणे या नागरिकांच्या मागणीला केराची टोपली दाखवीत असल्याने आज अखेर महाड शहर शिवसेनेच्या वतीने वाहतूक सेनेचे सुभाष मोरे, माजी नगरसेवक संदीप जाधव, सुरेश कळमकर, धनंजय देशमुख ,मंगेश देवरुखकर ,यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन पोलीस प्रशासनाला हे बेकायदेशीर दंडे तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे.