Thane : Bhiwandi ;
भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेच्या आयुक्तपदावर आलेली अजय वैद्य यांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वैद्य हे आयएएस नसताना नियमांचे उल्लंघन करून त्यांना या पदावर बसवण्यात आले आहे. ही नियुक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
अजय वैद्य यांना महापालिकेच्या आयुक्त पदाचा कोणताही अनुभव नाही. ते महाराष्ट्र विक्रीकर येथे उपायुक्त पदावर कार्यरत होते. राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार मनपा आयुक्त पदाँ फक्त आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. अजय यांच्या नियुक्तीसंदर्भात प्रधान सचिवांनी स्पष्ट निर्वाळा दिला की ते आयएएस नसल्यामुळे त्यांची नियुक्ती महापालिका आयुक्त म्हणून करण्यात येऊ नये. आयएएस अधिकारी वगळून इतर कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याची नेमणूक करताना प्रशासकीय सेवा निवड समितीची मान्यता व शिफारस बंधनकारक असते.
अशी कोणतीही शिफारस अथक मान्यता वैद्य यांची भिवंडीत नियुक्ती करताना घेतलेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले वैद्य यांनी यापूर्वी कोल्हापूर महापालिकेसाठी प्रयत्न केले होते, मात्र त्याठिकाणी आयएस दर्जाचाच अधिकारी आयुक्त पदावर बसू शकतो, असे स्पष्ट करत नगरविकास सचिवांनी असमर्थता दर्शविली होती. शिवाय काही आमदारांनीही त्यांना विरोध केला होता. त्यानंतर भिवंडी निजामपूर महापालिका आयुक्तपदी अजय वैद्य यांची वर्णी लागली. मात्र, या त्यांच्या नियुक्तीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीच आक्षेप घेतला आहे राज्य सरकारने 'ड' वर्ग महापालिकेत सेवा ३ मधील शहरी प्रशासकीय अधिकारी (पूर्वीचा मुख्यधिकारी संवर्गातील अधिक आह निती करणे आहे. मात्र सध्या नियमावलीतून इतर संपतील अतिरिक्त आयुक्त उपयुक्तच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होऊ लागल्या आहेत. अजय वैद्य यांची नियुक्तीहि याच प्रकारातील आहे.
राज्यात 17 महापालिकांचा "ड" वर्गात समावेश आहे. त्यामध्ये भिवंडी, पनवेल, वसई-विरार, मिरा भाईंदर, उल्हासनगरसह इतर महापालिका आहेत. त्यापैकी १३ ते १४ महापालिकांत आयएएस किंवा सेवा ३ शासकीय शहरी प्रशासकीय संवर्गातील अधिकारी महापालिका आयुक्त पदावर नियुक्त केले आहेत, तर इतर महापालिकांत इतर संवर्गातील म्हणजे सहकार, ग्रामविकास जीएसटी, बिक्रीकरसह अन्य खात्यातील अधिकायांची नियुक्ती केली जाते. ज्यांचा नगरविकास विभागाशी (यूडी) काहीमात्र संबंध नाही.
शासनाच्या आदेशाने माझी भिवंडी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. हे बदली आदेश बंधनकारक असून त्यानुसार मी काम करत आहे. अजय वैद्य, आयुक्त भिवंडी -निजामपूर महापालिका
मॅटने फटकारले तरी बदलीचा खेळ कायम :
वैद्य यांच्यानिमित्ताने भिवंडी महापालिकेच्या आयुक्तपदाचा वाद दुसऱ्यांदा उभा राहिला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह येऊ घातले आहे. गेल्या जूनमध्येच तत्कालीन पालिका आयुक्त विजयकुमार मासाळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांचा कार्यकाळही संपलेला नव्हता. मात्र वैद्य यांना बसवण्यासाठी म्हासाळ यांची बदली करण्यात आली.
म्हासाळ यांनी मॅटमध्ये धाव घेतली आणि मॅटने बदलीला स्थगिती दिली. बदलीसाठी कोणतेही ठोस कारण नाही. म्हासाळ है, बदलीस पात्र नाहीत. त्यांचा सीआर उत्तम आहे. त्यांच्या बदलीचा प्रस्ताव देखील नाही. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीने बदली झाली तरी ती बदली कायदेशीर ठरत नाही, म्हासाळ यांच्या बदलीत कायदेशीर तरतुदींचा भंग झाल्याचा ठपका मॅटने ठेवला. मॅटने फटकावले तरी वैद्य भिवंडीत आयुक्तपदी बसलेच आणि म्हासाळ यांचे नवी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर पुनर्वसन करण्यात आले. आता वैद्य यांच्या पात्रतेचाच मुद्दा उपस्थित झाला आहे.