अधिक मास – [पुरुषोत्तम मास ]

जनदूत टिम    22-Jul-2023
Total Views |
हिंदू पंचांगानुसार सुमारे साडे तीन वर्षानी अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास येत असतो.प्रत्येक वर्षाचे १२ महिने असतात, मग हा १३ वा महिना कुठून आला ? ह्यामुळे सर्वांगानी वर्षाचे गणित बिघडणार नाही का? असा प्रश्न कुणालाही पडावा.

अधिक मास 
 
वास्तविक तो योग्य देखील आहे.ही सारी अंक गणिताचीच करामत आपल्या पूर्वजांनी ओळखून त्यातून मध्यमार्ग शोधून काढला आहे.ह्या वर्षी मं गळ वार १८/०७ /२०२३ पासून अधिकमास सुरु होऊन तो बुध वार १६/०८ /२०२३ पर्यंत चालणार आहे.हा अधिकमासाचा काळ कुणीही स्वीकारण्यास तयार नव्हते.अखेर ह्या अतिरिक्त मासास भगवंताने स्विकारले.व स्वताचेच नाव पुरुषोत्तम मास म्हणून लावले.

अधिक मास 
 
१. अधिकमासाचे स्वरूप ..हिंदूंचे सण,उत्सव, व्रते,वैकल्ये,उपासना,हवन,शांती इ.सर्व धर्मशास्त्रातील कृत्ये चान्द्रमासा प्रमाणे म्हणजेच चंद्राच्या गतीनुसार ठरलेली असतात.चान्द्रमासाची नावे त्या त्या मासातील येणाऱ्या पौर्णिमेच्या नक्षत्रावरून पडली आहेत.ऋतू हे सौर मासानुसार [सूर्याच्या गतीनुसार] ठरलेले आहेत.चान्द्रवर्षानुसार ३५४ वर्षाचे दिवस तर सौरवर्षा नुसार वर्षाचे ३६५ दिवस असतात. म्हणजेच ह्या दोघात दर वर्षी ११ दिवसांचे अंतर पडते.ते भरून काढण्यासाठी म्हणजेच चान्द्र -सौर वर्षाचा मेळ बसविण्यासाठी स्थूलमानाने सुमारे ३२.५ मासानी ही दरी[gap] अधिकमास म्हणून भरली जाते.शक्यतेनुसार २७ ते ३५ मासानी ‘’अधिक मास/पुरुषोत्तम मास‘’येतो. ह्या काळात मंगलकार्या ऐवजी विशेष व्रते व पुण्यकारक व्रते केली जातात.म्हणून त्या मासास देवाचा मास असेही म्हणतात.सर्वसाधारणपणे अधिकमास चैत्र ते अश्विन ह्या सात मासापैकी एका मासात येतो [अपवाद म्हणजे फाल्गुन मास], मार्गशीर्ष,पौष,माघ, ह्या मासाना जोडून अधिकमास येत नाही. एकदा आलेला अधिकमास पुन्हा १९ वर्षांनी येतो. कालगणनेत प्रथम अधिकमास येऊन नंतर नीज मास [नेहमीचा] धरला जातो. प्रत्येक मासात सूर्य एकेका राशीत संक्रमण करतो.परतू अधिकमासात सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करीत नाही.,म्हणजेच अधिकमासात सूर्य संक्रांत नसते.त्यामुळे चंद्र-सूर्याच्या गतीत फरक पडतो.व ह्या पलटत्या रोगट वा ता वरणाचा वाईट परिणाम शरीरावर होऊ शकतो म्हणून त्यासाठी काही शास्त्रकारांनी उपाय सांगितले आहेत..
 
२. व्रते/वैकल्ये..अधिक मासाच्या संपूर्ण काळात उपवास,अयाचित भोजन व एकभुक्त असावे. शक्यतेनुसार तीन किंवा एक दिवस तरी हे पाळावे.संपूर्ण महिन्याभर दान करणे शक्य नसेल तर निदान शुक्ल /कृष्ण पक्ष,द्वादशी,पोर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चर्तुदशी, अमावस्या,ह्या तिथी व व्यतिपात, वैधृती,योगावर विशेष करून दान धर्म करावा.ह्या काळात पुरुषोत्तम कृष्णाची पूजा व नाम जप करावा.त्याचप्रमाणे प्रवचने/ कीर्तने द्वारे श्रवण भक्ती करावी.जेवताना बोलू नये. शक्यतेनुसार गंगा स्नान करावे. दीपदान करावे, अखंड दीप प्रज्वलन करावे. तीर्थ दर्शनासोबत,ताम्बुलदान गोपूजन,गोग्रास अर्पण आदी कर्मे करावीत.अपूप दान[ ३३ जाळीदार खाद्य पदार्थ उदा.अनारसे,बत्तासे,म्हेसुरपाक]करावे.विशेषत्वाने जावई पूजन करावे. ह्या काळातश्राद्ध कर्मे देखील करावीत. [अर्थात ह्या साऱ्या गोष्टी उपलब्धतेनुसारवाशक्यतेनुसार आनंदी वृत्तीत कराव्यात]...
 
३. अधिकमासाचे गणित ,....तत्कालीन असनाऱ्या शालिवाहन शकास १२ने गुणावे. व त्या गुनाकारास १९नेभागावे.जी बाकी असेलती ९ किंवा त्यापेक्षा कमी असेल त्या वर्षी अधिकमास येईल असे समजावे.भारतीय पुराणानुसार अधिकमासास पौराणिक कथेचा आधार अवश्य आहे....
 
४. तुळशीचे महत्व...अधिकमासात भगवंत म्हणजे विष्णूचे पूजन असल्याने त्यामध्ये तुळशी अर्पण फार महत्वाचे आहे. आरोग्य दृष्ट्या तुळस अत्यंत महत्वाची आहे.ती जंतू नाशक असल्याने वातावरण/परिसर शुद्ध करीत असते. तिचा उग्र दर्प कीटक ,जीव जन्तु दूर हटवीत असल्याने सदैवआरोग्यदाई वातावरण बनण्यास मदतच होत असते. त्यासाठी विष्णू पूजनात विष्णूच्या नावासोबत १०८/ १००८ तुळशीचीपाने वाहिली जातात .कृष्ण तुळस [काळी] ,व श्वेत तुळस [पांढरी] हे तुळशीचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत...
 
अधिकमासाच्या निमित्ताने...
. समाजात दातृत्वाची वृत्ती वाढावी.समाजातील आर्थिक दरी मर्यादेत राहावी .
. नित्याचे आपले उपकारक प्राणी/जनावरे इ.प्रती कृतज्ञता वाढावी
. दीप प्रज्वलनातून अज्ञानाच्याअंधकाराचा पूर्ण नाश होऊन समाजातील घाणेरड्या रूढी/परंपरा इ.चे पूर्ण उच्चाटन व्हावे.
. ईश्वरी शक्ती प्रती श्रद्धाभाव वाढीस लागून साऱ्या समाजाचा उत्कर्ष व्हावा,शांती पसरावी हा पूर्वजांचा विचार असावा.
 
रामकृष्ण विनायक अभ्यंकर
२/४६ भक्तियोग सोसा. परांजपे नगर,
वझिरा नाका बोरीवली प. मुंबई ४०००९१
मोबा.९८१९८४४७१०