भारतासाठी अभिमानाचा क्षण !

icc men"s world cup 2023 चौथ्यांदा भारतात आयोजित करण्यात येत आहे...

जनदूत टिम    28-Jun-2023
Total Views |
ICC World Cup 2023 :
आयसीसी विश्वचषक २०२३ चे सर्व सामने चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, तिरुवनंतपुरम, मुंबई, अहमदाबाद, पुणे, लखनौ, दिल्ली, गुवाहाटी, कोलकाता आणि धर्मशाला येथे खेळवले जातील.

भारतासाठी अभिमानाचा क्षण !  
 
ICC World Cup 2023 Venue :
आयसीसी विश्वचषक 2023 चा उत्साह वाढत चालला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर भारत ५० षटकांचा विश्वचषक खेळवला जाणार आहे. आयसीसी या स्पर्धेचे वेळापत्रक आज (२७ जून) जाहीर करणार करणार आहे. दरम्यान, वर्ल्डकप सामने खेळवण्यात येणाऱ्या ठिकाणांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. वास्तविक, ज्या शहरांत वर्ल्डकप सामने होणार आहेत. अशा १२ शहरांची नावे समोर आली आहेत.
आयसीसी विश्वचषक २०२३ चे सर्व सामने चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, तिरुवनंतपुरम, मुंबई, अहमदाबाद, पुणे, लखनौ, दिल्ली, गुवाहाटी, कोलकाता आणि धर्मशाला येथे खेळवले जातील. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार असल्याचे मानले जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे.
विश्वचषक २०२३ सुरू होण्यासाठी १०० दिवस बाकी आहेत. विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नाही. पण आज मंगळवारी (२७ जून) वेळापत्रक जाहीर केले जाऊ शकते असे मानले जात आहे.
 
आयसीसीच्या संभाव्य वेळापत्रकानुसार १५ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मेगा मॅच होणार आहे. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरू शकतात. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अहमदाबादमध्ये न खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जेव्हा सामना बाद फेरीचा असेल तेव्हाच त्यांना गुजरातच्या या स्टेडियममध्ये खेळायचे असल्याचे पीसीबीचे म्हणणे आहे.
 
याआधीचा म्हणजेच २०१९ चा वनडे वर्ल्डकप इंग्लंडच्या भूमीवर झाला होता. जेतेपदाच्या लढतीने उत्साहाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. त्यावेळी सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करून जेतेपद पटकावले होते. दोन्ही संघांचे स्कोअर बरोबरीत होते, त्यानंतर अंतिम सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. सुपर ओव्हरमध्येही इंग्लंड-न्यूझीलंडची धावसंख्या बरोबरीत राहिली, यानंतर सामन्यात अधिक चौकार मारल्यामुळे इंग्लिश संघाला विजयी घोषित करण्यात आले.