GT vs CSK IPL 2023 Final : Reserve Day च्या दिवशी मॅच झाली नाही, मग चॅम्पियन कोण, हे कसं ठरवणार?

29 May 2023 10:47:40
IPL 2023 Final on Reserve Day : पावसामुळे काल IPL 2023 चा फायनल सामना होऊ शकला नाही. आज अहमदाबादमधल हवामान कसं असेल? यावर क्रिकेटप्रेमींच लक्ष असणार आहे.

stadium 
 
अहमदाबाद : IPL 2023 च्या सीजनची फायनल मॅच रिझर्व्ह डे च्या दिवशी होणार आहे. 29 मे म्हणजे आज फायनलसाठी राखून ठेवलेला रिझर्व्ह डे आहे. आधी ठरल्याप्रमाणे फायनलसाठी मैदान तेच असणार आहे. हवामानाची स्थिती काय असेल? हा प्रश्न आहे. अहमदाबादमद्ये रविवारसारखी हवामानाची स्थिती राहिली तर काय? हा प्रश्न आहे. रिझर्व्ह डे च्या दिवशी सुद्धा मॅच झाली नाही तर काय?
 
IPL चा नवीन चॅम्पियन कसा निवडला जाणार?
पावसामुळे काल IPL 2023 चा फायनल सामना होऊ शकला नाही. 28 मे ही फायनलसाठी निर्धारित केलेली तारीख होती. काल चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्समध्ये फायनल मॅच सुरु होणार होती, पण तितक्यात पाऊस सुरु झाला.
हे असं पहिल्यांदा घडणार?
एकदा सुरु झालेला पाऊस थांबला नाही, त्यामुळे सामना रिझर्व्ह डे च्या दिवशी खेळवण्याचा निर्णय घ्यावा लागला. IPL फायनल रविवारी न होऊन इतर दिवशी होणार आहे. सोमवारी खेळली जाणारी ही पहिली आयपीएल फायनल आहे.
रिझर्व्ह डे च्या दिवशी फायनल झाली नाही तर काय?
आता क्रिकेटप्रेमींच्या मनात हा प्रश्न आहे की, आजही पाऊस कोसळला तर काय? मग गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन टीममधून चॅम्पियन कसा निवडणार? कारण काल पावसाने IPL 2023 च्या फायनलवर पाणी फिरवलं होतं.
 
आजही पाऊस झाल्यास ही टीम चॅम्पियन बनेल.
रिझर्व्ह डे च्या दिवशी पाऊस झाला आणि मॅच होऊ शकली नाही, तर विजेत्याचा निर्णय पॉइंट्स टेबलच्या आधारावर घेतला जाईल. म्हणजे पॉइंट्स टेबलध्ये जी टीम पहिल्या स्थानावर आहे, त्यांना विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. म्हणजेच गुजरात टायटन्सची टीम न खेळताच विजेता म्हणून निवडली जाईल. चेन्नईची टीम पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
Powered By Sangraha 9.0