Maharashtra HSC Result 2023 Date : विद्यार्थ्यांनो प्रतिक्षा संपली, इयत्ता 12 वीचा निकाल ‘या’ तारखेला लागणार

जनदूत टिम    24-May-2023
Total Views |
मुंबई;
Maharashtra Board HSC Result 2023 Date and Time : बारावी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष असते. याच्याच आधारावर पुढचे मार्ग ठरत असतात. आता ती वेळ आली आहे . 25 मे रोजी बारावीचा निकाल लागणार आहे.
 
nnn
 
मुंबई : इयत्ता बारावीचा निकाल लवकरच लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही निकालाची प्रतिक्षा संपुष्टात येणार आहे. बारावी नंतर पुढे काय? याचा निर्णय बारावीच्या निकालांवर अवलंबून असल्याने विद्यार्थी या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. बारावीनंतरच्या शैक्षणिक वाटचालीसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा असतो. फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या या परिक्षांचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर केला जातो. महाराष्ट्र स्टेट बोर्ड लवकरच निकालाची तारीख जाहीर करणार आहे. सायन्स, कॉमर्स, आर्ट तिन्ही विभागांचा निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्टच्या अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in पाहता येईल.यासोबतच विद्यार्थ्यांना SMS द्वारेही निकाल पाहता येणार आहे.
केव्हा होणार निकाल जाहीर?
महाराष्ट्र स्टेट बोर्ड 25 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. २५ मे रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल लागणार आहे.
 
कुठे पाहता येणार निकाल
Maharesult.nic.in
hsc.maharesult.org.in
hscresult.mkcl.org
SMS द्वारे कसा पहाणार निकाल?
SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जावून आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.
ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी या स्टेप फॉलो करा
महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahresult.nic.in) जावून HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.
महाराष्ट्र स्टेट बोर्डकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार, निकाल घोषित करण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. लवकरच निकाल घोषित करण्यात येईल. निकाल लागल्यानंतर काही दिवसातच विद्यार्थ्यांना त्यांचे ओरिजिनल मार्कशीट कॉलेजमधून मिळून जातील.