वासिंदमध्ये पुन्हा शिवसेना; विरोधकांना धोबीपछाड.

हजारो वासिंदकरांचा विश्वासू कौल लोकनेते स्वर्गिय विठ्ठलरावजी भेरे साहेब वासिंद विकास पैनललाच..!

जनदूत टिम    07-Nov-2023
Total Views |
Shahapur : Vasind ; 
वासिंद ग्रामपंचायत निवडणुकीत " विरोधकांना धोबीपछाड.."अक्षरश : चारी मुंड्या चित केलं हो .!.
शिवसेना उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक जणाने आपल्याला स्वर्गिय विठ्ठलरावजी भेरे साहेब यांच्या स्मरणार्थ विजय खेचून आणण्याची शपथ घेतली होती.

वासिंदमध्ये पुन्हा शिवसेना
 
आज सरपंच पदाच्या राजेंद्र म्हसकर यांच्या सह तब्बल चौदा सदस्य दणदणीत व एकतर्फी निवडून आले.विरोधकांच्या बड्या बड्या पुढारी मंडळींनी मोठ्या अफझलखानी घोषणा देत "आम्हाला फक्त पक्षीय नावाखाली सरपंच पद निवडून आले तरी बस झाले " असा बिनबुडाचा घातकी सूर आवळला होता.वासिंद सरपंच पदासाठी या ज्येष्ठ ,गर्विष्ठ वरिष्ठ नेत्यांनी जाम धनशक्ती पुरवली होती. मात्र,वारेमाप खर्च करून देखील विरोधकांचा वासिंदकर मतदारांनी सुपडा साफ करून टाकला...!
 
या वासिंद ग्रामपंचायत निवडणुकीचे दरम्यान राष्ट्रवादी व भाजप तथा आरपीआयच्या स्थानिक व तालुक्यातील नेत्यांचा आप आपसात चांगलाच कलगीतुरा रंगलेला दिसत होता. "हा उमेदवार काढा, तो उमेदवार उभा करा , याला इकडे बसवा, त्याला तिकडे घुसवा.."..हे बिनतिकटी जोक नाटक वासिंदकर लोकांना उघड उघड पहायला मिळाले.
 
लोकनेते स्वर्गिय विठ्ठलरावजी भेरे साहेब यांच्या व शिवसेना नेते बंडू शेठ शरुंगारपुरे यांच्या मृत्यूनंतर झालेली ही वासिंद ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचारातील सातत्य व योग्य नियोजन केलेमुळे मतदारांची पसंती मिळवली होती.
शिवसेना नेते दत्ता शेठ ठाकरे यांनी तर जाहिर आवाहन करून..या निवडणुकीत भाजपचे ओरिजनल उमेदवार दाखवून., माझे कडून एक लाख रुपये बक्षीस घेऊन जा..!असा खरमरीत सवाल विरोधकांना विचारला होता.या सवालाला वासुदेवी बिरबल महाराज व मिनिस्टर कळपात खाली पिली शोबाजी करून उंडारणा - या "धनगरांचं.." काळाकुट्ट मेंढरु जबाबाखातर साधं" बैं "उत्तर ही देऊ शकत नव्हतं.
 
कटटर शिवसैनिक म्हणविणाऱ्यांनी शिवसेनेशी पाठ दाखवून देखील वार्ड क्र ३ मधील हेमंत रसाळ यांचा निसटता पराभव झाला.किरकोळ व खूपच क्षुल्लक मतांनी पराभव झाल्यानंतर वासिंद शहरातील दिमाखदार विजयी मिरवणूक निघाली, तेव्हा शिवसैनिकांनी गुलालाचा धुरळा उडवत जल्लोष साजरा करुन हेमंत रसाळ यांना नाचत कौतुकाने खांद्यावर घेऊन सन्मानित केले.
 
घवघवीत व निर्विवाद बहुमत शिवसेना उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळाले .निवडून आणण्यासाठी आजारी असतानाही स्वतः च्या जीवाची पर्वा न करता ज्येष्ठ शिवसेना नेते गुरुनाथ जी ठाकरे, दोन "यंग स्टार" निळु दादा खरे,व विजय भोंडवे, यांनी कठोरपणे शिस्त बद्ध दिवस रात्र व भर उन्हात पायाला भिंगरी लावून प्रचार केला.शिंदे गटाचे मधुकरजी गायकर, जगदीश जी गिरी यांच्या मदतीने यश निश्चित झाले होते.
 
सरपंच पदाचे राजेंद्र म्हसकर यांच्या वासिंद शहरातील प्रचंड जनसंपर्कामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा झाली आणि घसघशीत यश पदरात पडले.शिवसेना नेते राजेंद्र भेरे, विलासशेठ पाटील ,सागर कंठे, विकास शेलार, यांनी विजयश्री खेचून आणली.शिवसेना नेत्या सौ.योगेश्री रमाकांत काठोळे वहिनी,सौ.मिनल शेट्ये, रविंद्र भेरे, मोहन जाधव,राजेश सोनवणे, आबा जगे, सुभाष विशे,सुनील ठाकरे,पपू पांडव, मोहन कंठे,प्रितम भेरे, सचिन रसाळ, समिर जोशी, तानाजी जाधव, प्रशांत भेरे सर,राजेश वेखंडे, अनिल काठोळे, जलील शेख, रुपेश राउत, ज्ञानेश्वर भोईर, गुरुनाथ घरत, प्रशांत पवार, हेमंत गवळी, राहुल विशे व विशेषतः वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपूर्ण वासिंद पिंजून काढला.आशा ताई,जाधव,पगारे परिवार,सुनील वामन जाधव, रविंद्र जाधव, नितेश भोसले, उबाळे , गुरुनाथ गायकवाड सर यांनी प्रचार नियोजन व्यवस्था चोख केली होती.वैभव प्रतिष्ठान चे सर्व शिलेदारांनी डोळ्यात तेल घालून कमालीची दक्षता घेऊन वार्ड क्र ६ मध्ये मतदान आकडेवारी वाढती व कायमची राखली.शिवसेनेचे संदिप खिसमतराव व परेश शिंगवे यांनी देखील प्रचंड मेहनतीने प्रचार केलेला दिसून आला. दुर्दैवाने अपेक्षित यश लाभलं नाही. शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या महिला वर्गाचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.. प्रत्येक वार्डातील मतदार यादी मधुन नाव शोधणे आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महिलांनी स्विकारले होते.. प्रचार रैलीत पुढाकार यांचाच असायचा. आणि विजयाचे खरं खुर श्रेय या वासिंदकर रणरागिणींना निश्चितच आहे.
 
वासिंदकर मतदारांनी जो विश्वास दाखवला आहे तो एक पालक व राखणदार सेवक म्हणून वासिंद शिवसेना शहर, नवनिर्वाचित सरपंच राजेंद्र म्हसकर व इतर सर्व सदस्य वासिंद शहर विकास साठी कटिबद्ध राहणार आहेत याची ठामपणे खात्री देतो..!
धन्यवाद.
पुनश्च एकदा जागरूक व सुज्ञ नागरिक मतदारांचे
🙏जाहीर आभार .🙏
🚩जय महाराष्ट्र 🚩
आपला वासिंदकर
संजय सुरळके
(शिवसेना उपतालुकाप्रमुख)