Education : राज्यात फार्मसी कॉलेजे ओस !

पाच कॉलेजांमध्ये शून्य विद्यार्थी...

जनदूत टिम    06-Nov-2023
Total Views |
Maharashtra : Pharmacy Education : 
राज्यात बी. फार्मसीच्या कॉलेजांमध्ये भरमसाट वाढ झाल्याने त्या कॉलेजांमधील विद्याथ्र्यांच्या प्रवेशांवर विपरित परिणाम झाला आहे. सध्याची आकडेवारी पाहिल्यास राज्यातील बी. फार्मसीच्या पाच कॉलेजांमध्ये एकाही विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला नाही. तब्बल २१ कॉलेजांमध्ये दहापेक्षा कमी आणि ७१ कॉलेजांमध्ये ३० पेक्षा कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

राज्यात फार्मसी कॉलेजे ओस 
ही बहुसंख्य कॉलेजे खासगी असल्याने विद्यार्थी संख्येअभावी त्या कॉलेजांमधील शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती आहे. राज्यात यंदा बी. फार्मसीच्या ५७ नवीन कॉलेजांना मान्यता देण्यात आली आहे. त्यातून बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या कॉलेजांची संख्या १४५३वर पोहचली आहे. या कॉलेजांतील जागांमध्ये गेल्यावर्षीच्या ३६,८८८ वरून यंदा ४२, ७९४ पर्यंत वाढ झाली. त्याचवेळी फार्मसी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. गेल्यावर्षी राज्यात बी. फार्मसीला ३२, १३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यंदा ही संख्या रोडावून २८, ४३२ विद्यार्थी झाली आहे. परिणामी यंदा फार्मसीच्या १४,३६२ जागा रिक्त राहिल्या आहेत. विद्याथ्र्यांच्या मागणीच्या तुलनेत बी. फार्मसीच्या जागांमध्ये भरमसाट वाढ झाल्याने अनेक कॉलेजांतील जागा मोठ्या संख्येने रिक्त आहेत.
 
  • २१ कॉलेजांमध्ये दहाहून कमी विद्यार्थ्यांचा प्रवेश
  • फार्मसी कॉलेजांच्या गुणवत्तेवर परिणाम
 
बी. फार्मसीची स्थिती
  • राज्यात यंदा ५७ नवीन कॉलेजांना मान्यता
  • कॉलेजांची संख्या वाढून ४५३
  • गेल्यावर्षीच्या जागा ३६.८८८३ यंदा ४२,७९४ जागा
  • गेल्यावर्षी राज्यात ३२,१३७ विद्याथ्र्यांचा प्रवेश: यंदा केवळ १२८,४३२ विद्यार्थ्यांचा प्रवेश
  • कमी प्रवेशामुळे यंदा फार्मसीच्या १४,३६२ जागा रिक्त
फार्मसी अभ्यासक्रमासाठी बहुतांश कॉलेजांमध्ये ६० किंवा १०० जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांअभावी अनेक कॉलेजांमध्ये या जागा रिक्त राहिल्या आहे. राज्यातील २१ कॉलेजांमध्ये १०. पेक्षा कमी ५० कॉलेजांमध्ये २० पेक्षा कमी, ७१ कॉलेजांमध्ये ३०पेक्षा कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यातून या कॉलेजांना त्यांचा खर्च भागविणेहो जिकरीचे होणार आहे. राज्यात एका वर्षांत मोठ्या संख्येने कॉलेजे वाढल्याने जागा रिक्त राहणे अनपेक्षित नव्हते.
 
ज्या भागांत कमी अंतरावर अनेक कॉलेज सुरू झाल्याने त्याचाही हा परिणाम आहे. राज्यात इतक्या कॉलेजांची गरज आहे का? याचा अभ्यास न करताच हा निर्णय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यात आवश्यकतेपेक्षा जास्त फार्मसी कॉलेजे झाली असून, नवीन फार्मसी कॉलेजांबद्दल विद्याथ्र्यांना माहिती नाही. त्यामुळे कॉलेजांमध्ये प्रवेश झाले नसल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी, राज्याला आणि आरोग्य व्यवस्थेला एवढ्या फार्मासिस्टची गरज आहे का? याचा अभ्यास होणे आवश्यक असल्याचे मत 'इंडियन फार्मासिटीकल असोसिएशन'च्या उपाध्यक्ष प्रा. मंजिरी घरत यांनी व्यक्त केले.
  
नवीन परवानगी देणे थांबवावे राज्यातील नवीन फार्मसी कॉलेजांबाबत विद्याथ्र्यांना माहिती नसल्याने तिकडे त्यांनी प्रवेश घेतले नाहीत. दुसरीकडे उत्तम शिक्षण देणाऱ्या कॉलेजांमध्ये प्रवेशाचा टक्का वाढला आहे. यंदा फार्मसीची प्रवेश प्रक्रिया इंजिनीअरिंगपेक्षा उशिरा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतले, अशी माहिती अखिल भारतीय फार्मसी शिक्षक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मिलिंद उमेकर यांनी दिली. राज्य सरकार, विद्यापीठ आणि तंत्रशिक्षण विभागाने यापुढे फार्मसीच्या नवीन कॉलेजांना परवानगी देणे थांबवावे. अभ्यासक्रमाला मागणी व पुरवठा याचा ताळमेळ आणि शिक्षणाचा । दर्जा राखणे आवश्यक आहे, अशी मागणीही प्रा. उमेकर यांनी केली.