मुंबईतील रस्ते, पदपथ धुवून काढणार...

प्रदूषणाविरुद्ध आघाडी.

जनदूत टिम    04-Nov-2023
Total Views |
Maharashtra : Mumbai ; 
हवेतील प्रदूषणाला कारण ठरणारी धूळ नियंत्रित करण्यासाठी आता संपूर्ण मुंबई धुवून काढली जाणार आहे. मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वदळीचे पदपथ स्वच्छ करून ते पाण्याने धुवून काढण्याची कामे महापालिकेने सुरू केली आहेत. शहरातील ६५० किमीचे रस्ते नियमित धुण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी पाण्याचे १२१ टैंकर व इतर यंत्रे. मनुष्यबळ नेमण्यात आले आहेत.

मुंबईतील रस्ते पदपथ धुवून काढणार 
 
पुनप्रक्रिया केलेल्या, तसेच स्थानिक स्रोतांमधील पाण्याचा यासाठी वापर करण्यात येत असल्याने पिण्याच्या पाण्याची नासाडी होणार नाही, अशी माहिती पालिकेतर्फे देण्यात आली आहे. मुंबईतील हवेच्या प्रदूषणावर केल्या जात असलेल्या उपाययोजनांची प्रगती जाणून घेण्यासाठी अतिरिक्त पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी शुक्रवारी बैठक घेतली. रस्ते व पदपथांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेच्या वतीने वाहन आधारित धूळप्रतिबंधक यंत्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यासोबतच सर्व प्रशासकीय विभागांमध्ये स्वच्छतेची कामे केली जात आहेत.
 
  • ६५० किमीच्या रस्त्यांची स्वच्छता
  • १२१ टँकर, यंत्रे, मनुष्यबळ तैनात
  • पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर
 
मुंबईसह महानगर प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. पालिकेने ठरवून दिलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटकोर अंमलबजावणी करण्यात यावी. विशेषतः रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी अधिक दक्षतेने कामे करण्यात यावीत, असे निर्देश डॉ. शिंदे यांनी दिले आहेत. धूळप्रतिबंधक यंत्र वाहने अधिकाधिक संख्येने तैनात करावीत. पालिकेने वायुप्रदूषणासाठी जाहीर केलेल्या सूचनांप्रमाणे, बांधकाम साहित्य तसेच राडारोडा (डेब्रीज) ने-आण करणारी वाहने झाकलेली असावीत. ही वाहतूक करताना, प्रत्येक खेपेस त्यावर पाण्याची फवारणी करावी. वाहनांची पूर्ण स्वच्छता करावी. राडारोड्याची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांवर जीपीएस प्रणाली कार्यान्वित असावी. पालिकेच्या यंत्रणेसोबत व्हेईकल ट्रैकिंग अँड मॉनिटरिंग सिस्टीम यंत्रणा लिंक करावी, असे शिंदे यांनी या बैठकीत सांगितले. टोल प्लाझा स्वच्छतेसाठी राज्य रस्ते विकास महामंडळाला सूचित करण्यात यावे, असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.

मुंबईतील रस्ते पदपथ धुवून काढणार 
 
६० फुटांपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर, तसेच पदपथांवरील धूळ हटवण्यासाठी आधी ब्रशिंग करून नंतर पाणी फवारणी केली जाते आहे. ज्या रस्त्यांवर तसेच पदपथांवर अशी कार्यवाही करावयाची आहे, त्यांची निवड विभाग कार्यालयांनी केली आहे. जिथे वाहनांची व नागरिकांची अधिक वर्दळ असते अशा रस्ते व पदपथांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. पाणी टँकरची संख्या, टँकर फेऱ्यांची संख्या आणि पुनप्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुरवठ्याचा सर्वात जवळचा स्रोत यांचा समावेश तपशीलवार आराखड्यात करण्यात येत आहे. पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा तसेच तलाव, विहीर, कूपनलिका यामधील पाण्याचा वापर केला जात असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी नमूद केले.
 
पहाटे ३ ते ६ दरम्यान धुलाई ;
मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनमानात व्यत्यय येऊ नये आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कमी वर्दळीच्या कालावधीत म्हणजे पहाटे ३ ते सकाळी ६ दरम्यान रस्ते धुण्याची कामे केली जात आहेत, तर काही विभागांमध्ये वर्दळ कमी असल्यास दुपारच्या अथवा सायंकाळच्या वेळेत ही कार्यवाही केली जात आहे. रस्ते व पदपथ धुण्याचे काम ३ ते ४ तासांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
९७ बिल्डर, २७ कंत्राटदारांना नोटिसा
बांधकामांच्या ठिकाणी स्प्रिंकलर, स्मॉग गन यांसह विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यासाठी महापालिकेने बिल्डरांना १५
दिवसांची मुदत दिली आहे. मात्र, तत्पूर्वीच खबरदारी म्हणून या उपाययोजना राबविण्यासाठी नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईतील रस्ते पदपथ धुवून काढणार 
 
मालाड भागात १७ बिल्डरांना अशा नोटीस देण्यात आल्या आहेत. तसेच महापालिका, मेट्रो, एमएमआरडीए यांच्यासह रस्ते. उड्डाणपूल, खोदकाम, अशी विविध कामे सुरू असलेल्या संबंधित २७ कंत्राटदारांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मुंबईतील हवेची ढासळलेली गुणवत्ता, बांधकामांची धूळ, वाहनांचे प्रदूषण या सर्व कारणांमुळे मुंबईत हवेतील प्रदूषणात वाढ होत आहे. या पाश्र्वभूमीवर पालिकेने बांधकाम व्यावसायिकांना पुढील १५ ते ३० दिवसांत उपाययोजना करण्याचे "निर्देश दिले आहेत. मुलुंड येथे एका बिल्डरने नियमांचे पालन न केल्याने बांधकाम थांबविण्याची नोटीस देण्यात आल्यानंतर आता पालिकेच्या मालाड पी/उत्तर विभागातर्फे बिल्डर व कंत्राटदारांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे.
 
सर्व बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांनो स्प्रिंकलर आणि स्मॉग गन घेईपर्यंत मूलभूत प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करावे, यासाठी या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती पी / उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
मालाड परिसरात अनेक पुनर्विकास प्रकल्प सुरू आहेत. परिणामी स्थानिक पातळीवर धुळीचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे बांधकामांच्या जागी पत्र्यांचे आच्छादन, कापडी, ताडपत्र्यांची आवरणे बसवण्यास सांगितली आहेत.
 
बांधकामांच्या ठिकाणचा राडारोडा हटवावा, धूळ उडू नये यासाठी पाण्याची फवारणी, ट्रक किंवा इतर वाहनांना धूळ चिकटून हवेत पसरू नये यासाठी वाहनांची चाके पाण्याने स्वच्छ करणे यासह पालिकेने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी या नोटिसा असल्याचे दिघावकर म्हणाले, सर्व उपाययोजनांसाठी प्रशासनाने महिनाभराचा कालावधी दिला आहे. आम्ही अद्याप कुणालाही बांधकाम थांबविण्याची नोटीस जारी केलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
जीएमएलआर कंत्राटदाराला नोटीस :
गोरेगाव मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर) प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदारालाही पालिकेने नोटीस बजावली आहे. रस्तेकामासाठी खोदण्यापूर्वी परवानगी घेण्यास सांगितले आहे, रहने, नाते या सर्व बांधकामाच्या ठिकाणी पालिकेत सांगितलेल्या उपाययोजना राबवणे बंधनकारक आहे.
 
बांधकाम तसर परवानगी येऊनच करावीत वाहनांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व साइट्सवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, आवश्यक ठिकाणी कापडांचे आच्छादन आवश्यक असून, बांधकामांचा राडारोडा कुठेही साठू देऊ नये, अशा सूचना कंत्राटदाराला करण्यात आल्या आहेत. सूचनांचे पालन न केल्यास उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे
  • बांधकामांच्या जागी पत्रे, ताडपत्री बसवणे
  • बांधकामांच्या ठिकाणचा राडारोडा हटवावा
  • धूळ उडू नये यासाठी पाण्याची फवारणी
वसा स्वच्छ शहराचा ;
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील हवा दिवसेंदिवस खराब होत असल्याने चिंता वाढली आहे. प्रदूषण हे त्यामागचे एक प्रमुख कारण आहे. यामुळे महापालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी आघाडी उघडली आहे. या अंतर्गत मुंबईतील रस्ते आणि पदपथ पाण्याने धुवून काढले जाणार आहेत. तसेच बांधकामांच्या धुळीने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी स्प्रिंकलर, स्मॉग गन वापरण्याच्या सूचना केल्या आहेत.