"म्हणुनच मला मुंबई आवडते"

हि कृतीच महाराष्ट्राच्या कणाकणात आणि मनामनात शिवराय कसे भिनले आहेत याचे दर्शन घडवते.

जनदूत टिम    02-Nov-2023
Total Views |
Maharashtra : Mumbai :
शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता दिंडोशी आगाराची ३९८ क्रमांकाची महाराणा प्रताप चौक ते आरे कॉलनी या बसमार्गावरील बेस्ट बस साकीनाका येथे आली. त्यात २५ वर्षाची महिला चढली.
 
प्रशांत मयेकर आणि राज रामगुडे
 
बस मध्ये ही महिला एकटीच होती, तिला रॉयल पाम्स ला जायचे होते. मात्र ही बस आरे मार्केट जवळून जाणार होती म्हणून तिला तिथे उतरावे लागले, पण तिला पुढची रिक्षा मिळेपर्यंत बसमधील चालक प्रशांत मयेकर आणि कंडक्टर राज रामुगडे यांनी बस थांबवुन ठेवली. या दोघांनी मध्यरात्री दीड वाजता माणुसकीचे दर्शन घडविले. त्या महिलेचे नाव मंताशा शेख आहे. ती सुद्धा ह्या घटनेने भारावून गेली व तिने हा अनुभव व दोघांची माणुसकी ट्विटर वर पोस्ट केल्यामुळे उजेडात आली. मंताशा शेख यांनी ट्विटर वर "हेच कारण आहे ज्यामुळे मला मुंबई आवडते" असेही म्हटले आहे.
 
एकीकडे भारताच्या राजधानीत दिल्लीमद्धे झेड प्लस सिक्युरीटीच्या गजबजाटातही रात्री अकरा-बारा च्या सुमारास चालत्या बसमध्ये महिलेवर बलात्कार झाला होता तर दुसरीकडे रात्री दिडच्या सुमारासही एका महिलेच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाच्या नियमांना बगल देऊन मुंबईकर बस वाहक चालक पाय रोवुन उभे राहतात.. हि घटनाच मुंबईत महिला सुरक्षित आहेत हा संदेश देण्यास पुरेशी आहे...
 
प्रशांत मयेकर आणि राज रामगुडे यांची हि कृतीच महाराष्ट्राच्या कणाकणात आणि मनामनात शिवराय कसे भिनले आहेत याचे दर्शन घडवते... त्यांच्या या कार्याची दखल मनसे महिला संघटनेने घेतली. मनसे सरचिटणीस सौ. रीटाताई गुप्ता यांनी या दोघांचा सत्कार वहिणीसाहेबांच्या (सौ. शर्मिला राजसाहेब ठाकरे) यांच्या हस्ते करायचे ठरवले..त्यांना मानाने कृष्णकुंजवर बोलावण्यात आले.. वहिणीसाहेब व रिटाताई गुप्ता यांनी त्या दोघांचा यथोचित सत्कार करून प्रत्येकी १० हजार रुपये भेट म्हणून दिले...
 
हा सत्कार त्या प्रत्येक पुरूषाचा आहे जो स्त्रियांची सुरक्षितता हि आपली जबाबदारी आहे या भावनेतुन समाजात वावरत असतो.. प्रशांत मयेकर आणि राज रामगुडे तुमच्यासारख्या मराठी लोकांमुळे महाराष्ट्राची मान उंचावते आहे. तुमच्यां या कार्याला मनसे सलाम.