ठाणे पालिका राबवणार 'मूक बधीर बालक मुक्त' मिशन...

30 Oct 2023 10:22:56
Maharashtra : Thane ; 
भारतात दरवर्षी जन्माला येणाऱ्या एकूण बाकी ७०-८० हजार बालकांमध्ये ऐकू येण्याची क्षमता नसते. आंतरराष्ट्रीय आकडेवारीनुसार दर १००० बालकांपैकी १-२ बालकांमध्ये कर्णदोष असतो. समः कमी वजनाची बालके यांचे वजन १५०० पेक्षा कमी आहे किंवा ज्या बालकांना व्हेंटिलेटरची आवश्यकता असते अशा बालकांमध्ये शक्यता दहा पटीने वाढते.

ठाणे पालिका राबवणार मूक बधीर बालक मुक्त मिशन  
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात प्रतिवर्षी अंदाजे २२ ते २५ हजार बालकांचे जन्म होतात. या अंदाजानुसार शहरात प्रतिवर्षी २५५० बालकांमध्ये कर्णदोष आढळून येत असल्याचा महापालिकेचा निष्कर्ष आहे. यासाठी आता ठाणे महापालिकेने मूकबधीर बालक मुक्त ठा योजना आखली आहे. ज्यामध्ये पालिकेच्या रुग्णालयात तसेच खाजगी जन्माला येणाऱ्या सर्व बालकांची तपासणी करून कर्णदोष असल्याम त्यांच्यावर वेळेवर उपचार केले जाणार आहेत.
  
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकही बालक मूकबधीर राहणार नाही, या उद्देशाने मूकबधीर बालक मुक्त ठाणे ही योजना मोठ्या स्तरावर राबवण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात जन्माला येणाऱ्या सर्व नवजात बालकांची कर्णदोषासाठी स्क्रीनिंग केले जाणार आहे. स्क्रीनिंग करिता ६ मशीन विकत घेण्यात येणार आहेत. या योजने अंतर्गत अंतर्गत महानगरपालिकेची प्रसूतीगृहे व लालये तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये जन्माला येणाऱ्या सर्व नवजात शिशुंची जन्मानंतर तपासणी करून सदर तपासणीचा अहवाल तयार करण्यात येणार आहेसामुळे नवजात शिशुचा दोन्ही कानांचा अहवाल आल्यास बाळाम कर्णदोष आहे कि नाही पाचे वेळेत निदान होणार आहे.
 
महापालिकेचे णालय व प्रसुतीगृहांमध्ये तपासणी मोफत करण्यात येणार आहे ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात कर्णदोष असणाऱ्या बालकांवर पूर्वी देखील शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मात्र रुग्ण स्वतःहून आल्यास त्याच्यावर उपचार केले जात होते. मात्र आता व्यापक स्वरूपात ही मोहीम राबवण्यात येणार असल्याने याचा फायदा ठाणे महापालिका क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी रुग्णालयात जन्माला येणान्या सर्व नवजात बालकांना होणार आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने यासाठी तब्बल ४ कोटी ४३ लाख ७५ हजार रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे.
 
ठाणे महापालिका क्षेत्रातील बालकांनाच मिळणार योजनेचा लाभ..
या योजनेचा लाभ फक्त ठाणे महानगरपालिका क्षेत्रात रहिवास करणाया कुटुंबातील बालकांना लागू राहणार आहे. ठाणे महानगरपालिका हीतील रहिवासाबाबत संबंधित बालकाच्या पालकांची अद्ययावत आधार कार्ड क शिधापत्रिका निर्णायक पुरावा असेल. या व्यतिरिक्त इतर पुरावा प्रापरला जाणार नाही.
 
खाजगी रुग्णालयांकडून महिन्याला अहवाल घेणार...
खाजगी रुग्णालयामधून जन्म घेणाऱ्या सर्व नवजात शिशुंची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत परिपत्रक काढण्यात येणार आहे. तसेच त्या अनुषंगाने खाजगी रुग्णालयामध्ये होणाच्या तपासणीचे अहवाल दरमहा आरोमा विभाग मुख्यालय येथे घेण्यात येणार असल्याचे या योजनेत नमूद करण्यात आले आहे.
 
स्पीच थेरपीची सुविधा मिळणार...
यशस्वी शस्त्रस्क्रिया झालेल्या पालकांना पुढील दोन वर्षे आण्याची क्षमता पूर्णपणे चिकसित करण्यासाठी वारंवार स्पीच थेरपी देणे आवश्यक असते. याकरिता स्पीच थेरपी देण्यासाठी ऑडियोलॉजिस्ट आणि स्पीच बेरपिस्ट हे पद छत्रपती शिवाजी महाराज याच्या आस्थापनेवर मान्यता प्राप्त आहे. उपरोक्त पद भरून त्यानुसार रुग्णांना स्पीच थेरपी देण्यात येणार
आहे.
Powered By Sangraha 9.0