रविवारच्या पडघां बाजाराची दुरवस्था .....

जनदूत टिम    14-Jan-2023
Total Views |
  • पुढारी, आमदार लाचारीने आणि गद्दारीने पछाडलेले दलाल!!!!
  • अपघात झाल्यास पाच पंचवीस लाईनीत जिवानिशी मरतील
  • सरपंच कमिटी माती चोरी आणि सरकारी जागा व्यवहारात मश्गूल !!!!
ठाणे :- मुंबई - नाशिक महामार्गावर ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या पडघा येथील बाजारामध्ये हजारो गरीब, आदिवासी, कष्टकरी नागरिक आपला बाजार हाट करून आठड्याची साठवणूक करीत असतात.

padga bhajar
 
तीन तालुक्यांच्या असलेल्या या बाजाराला मोठा इतिहास आहे. 100 ते 125 वर्षाची परंपरा असलेल्या पडघा बाजाराला जिल्ह्यात नव्हे तर नाशिक सह उत्तर महाष्ट्रातील जिल्ह्यासह अहमदनगर सह ठिकठिकाणचे नागरिक खरेदीसाठी येथे येत असतात. हा बाजार पूर्वी गावातील जुन्या रस्त्यावर भरला जायचा आज बाजार हळू हळू गावाबाहेर पोहचला आणि तो तडक नॅशनल हायवेवर येऊन बसला आहे.
 
padga bhajar
 
ग्रामपंचायत प्रशासन आणि गावातील नागरिकांमध्ये दूरदृष्टी चा अभाव असल्याने पडघा गावाचा विकास म्हणावा तसा झालाच नाही. उपरे आणि स्थानिक यांच्यात न जुळलेले सुत या ठिकाणच्या बकालपणाला जबाबदार ठरले आहे. तर आज सरपंच कमिटी माती चोरी आणि सरकारी जागा व्यवहारात मश्गूल !!!! आहेत.

padga bhajar
 
आमदार या गावात राहतात, जिल्हाप्रमुख येथे राहतात, पंचायत समितीच्या सभापती येथे राहतात अनेक
आज शहरीकरण झालेल्या पडघा गावला विद्रुपीकरण झालेलेच पाहायला मिळते. पडघा येथील भ्रष्ट आणि लाचारीने कळस गाठलेल्या या शहराला कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. हे येथील पुढाऱ्यांचे अपयश दुर्लक्षून चालणार नाही.

padga bhajar
 
हायवेवर भरणाऱ्या पडघ्यातील आठवडी बाजारात एके दिवशी अपघात झाला तर फार मोठी जीवित हानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

padga bhajar
 
सुशिक्षीत म्हणविणाऱ्या या गावात नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणी घ्यायला तयारच नाहीत अशी स्थिती आहे.