२० हजार अनधिकृत बांधकामे तोडण्याची आश्वासने ..?

जनदूत टिम    24-Jul-2022
Total Views |

२० हजार अनधिकृत बांधकामे तोडण्याची आश्वासने देऊन जोरदार वसुली..? 
 
कडोंमपा, डोंबिवली पश्चिम, तेलकोसवाडी, जणगनमण शाळे जवळ, तळ+५ मजल्याचे अनधिकृत बांधकाम जोरदारपणे सुरू असुन. सदर बांधकामावरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून तोडक कारवाई करण्यात आली होती. पण सेटलमेंट झाल्या कारणाने सदर बांधकाम जोरदारपणे सुरू असुन.
 
*२० हजार अनधिकृत बांधकामे तोडण्याची आश्वासने

अतिरीक्त आयुक्त मा. सुनील पवार यांनी सात दिवसात सदर बांधकाम पुर्णपणे तोडण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. त्यांच्या आश्वासणानंतर मी आझाद मैदान मुंबई येथील उपोषण हे तुर्तास स्थगित केले होते. पण त्यांनी त्यांचा शब्द राखला नाही. तरी दिनांक २० जूलै २०२२ रोजीपासुन आझाद मैदान मुंबई येथे पुन्हा उपोषणांस बसणार होतो. पण काही कारणास्तव सदरील उपोषणांस दिनांक ०८/०८/२०२२ रोजी पासुन कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालया समोर सुरवात केली जाईल. 
--- कल्पेश गंगाराम जोशी