शिवसेना बंडखोर महा विकास आघाडीच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार

मिलिंद माने    28-Jun-2022
Total Views |
मुंबई : शिवसेना नेते व विद्यमान नगर विकास मंत्री व बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या संख्याबळावरच येत्या दोन दिवसात महाविकास आघाडी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असून भाजपा पुन्हा एकदा पाठीमागून मदत करून महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांची कशी बंडखोर गट लक्तरे कशी वेशीवर टांगतात याचा प्रत्यक्ष अनुभव सभागृहात गप्प बसून घेणार असून यासाठी भाजपाने आपल्या आमदारांसह मित्रपक्षाच्या आमदारांना उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत मुंबईत येण्यास सांगितले आहे.

ert 
 
भाजपा कोर कमिटीची बैठक सोमवारी पार पडली या बैठकीत महाविकास आघाडी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असून बंडखोर सेना आमदारान मार्फत तो सभागृहात आणणार आहेत त्यासाठी त्यांनी आपल्या आमदारांशहीत भाजपाला समर्थन देणाऱ्या आमदारांना मुंबईत येण्यास फतवा जाहीर केला आहे महाविकास आघाडी सरकार बंडखोर सेना आमदारांमुळे पडल्यास या आमदारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.
राज्यपाल सक्रिय
राज्यपाल भगतसिंह को शयार कोरोना तून मुक्त झाले असून राज्यपालांनी विरोधात महाविकास आघाडी सरकारने यापूर्वी त्यांना विमानातून उतरविले होते तसेच महा विकास आघाडी सरकारने विधानसभेत अर्थसंकल्पीय भाषणाच्या विरोधात दिलेल्या घोषणा महा विकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची सामना या त्यांच्या वृत्तपत्रातून काढलेले वाभाडे तसेच वेळोवेळी राज्यपालांना पत्र पाठविताना वापरलेली भाषा याचा राग राज्यपालांच्या मनात कायम आहे त्यामुळे राज्यपाल देखील संधीची वाट पाहत होते आता ती संधी बंडखोर सेना आमदारांमुळे चालून आली असून राज्यपाल आता ऍक्शन मोडवर असून बंडखोर येना आमदारांनी आघाडी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव दिल्यास राज्यपाल विधानसभा अध्यक्ष तथा विद्यमान उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना ठराविक दिवसात सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देऊ शकतात. महा विकास आघाडी सरकार जवळ आत्ताच्या घडीला 116 आमदारांचे समर्थन आहे तर बंडखोर सेना आमदार जोपर्यंत गुवाहटी वरून तोपर्यंत भाजपाकडे 128 आमदारांचे समर्थन आहे.
शिवसेनेचे सध्याचे चित्र
शिवसेनेकडे सध्या 19 शिवसेना नेते आहेत तर उप नेत्यांची संख्या 32 आहे तर पाच सचिव व 11 प्रवक्ते असून लोकसभेचे 19 खासदार तर राज्यसभेचे तीन खासदार बंडखोर धरता पंचावन्न आमदार व एका आमदाराचे निधन झाल्याने रिक्त जागा 14 विधानपरिषद सदस्य व पाच महापौर आहेत.
सध्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे गुलाबराव पाटील दादा भुसे संदिपान भुमरे उदय सामंत या व्यतिरिक्त शंभूराज देसाई राजेंद्र यड्रावकर अब्दुल सत्तार व अपक्ष बच्चू कडू या राज्यमंत्र्यांकडे असणारा मंत्रीपदाचा कार्यभार काढून घेतला आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रात सध्या विचित्र स्थिती आहे उद्धव सेनापति असले तरी सद्यस्थितीत सेना त्यांच्याजवळ नाही तर बंडखोर गटाचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांच्या जवळ सेना असली तरी सत्ता नाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष व महाविकास आघाडीचे करता-करविते शरद पवार हे जरी शिवसेनेबरोबर असले तरी शिवसैनिक त्यांच्याबरोबर नाही तर तर काँग्रेस जर या दोन पक्षांबरोबर या घडीला असली तरी त्यांच्याजवळ कोणीच नाही अशी विचित्र अवस्था महाराष्ट्रातील या तिन्ही पक्षांची झाली आहे.
शिवसेनेचे कोकण कोकणची सेना
शिवसेनेला सुरुवातीपासून आजपर्यंत शिवसेनेने साथ दिली असून नारायण राणे यांच्या बंडखोरी नंतर देखील कोकणातील शिवसेनेच अस्तित्व कमी झालेलं नव्हतं आजच्या घडीला रायगड मधील तीन रत्नागिरी मधील दोन सिंधुदुर्ग मधील एक आमदार बंडकर सेनेत सामील झाला असला तरी मूळचा कोकणातील शिवसैनिक जोपर्यंत मुंबईत आहे व मुंबईतून गावाकडील शिवसेना चालवित आहे तोपर्यंत सेनेचे नेतृत्व कोकणातून कोणीच कमी करू शकणार नाही कोकणात शिवसेनेच्या 15 आमदारांपैकी बारा आमदार शिंदे गटाकडे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी वैभव नाईक तर रत्नागिरी ची जबाबदारी भास्कर जाधव व राजन साळवी यांच्यावर आहे तर रायगड ची जबाबदारी मावळचे खासदार श्रीरंग बारणे व माजी मंत्री अनंत गीते यांच्यावर आहे तर ठाण्याची जबाबदारी राजन विचारे व आणि माजी आमदार सुभाष भोईर यांच्याकडे आहे तर पालघर ची जबाबदारी सुरेंद्र म्हात्रे यांच्याकडे दिली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत व संदेश पारकर हे शिवसेनेत सक्रिय आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील उदय सामंत व योगेश कदम हे शिंदे गटात गेलेत तर सेना नेते रामदास कदम हे शिवसेनेतच आहेत त्यामुळे योगेश कदम पुन्हा शिवसेनेत येऊ शकतात.
शिवसेना-भाजप राष्ट्रवादी मनसे बहुजन विकास आघाडी शि पीएम यांची संख्याबळ
सध्याच्या घडीला भाजपाचे दहा आमदार व एक खासदार तर शिवसेनेचे तीन आमदार व चार खासदार शिंदे गटाकडे बारा आमदार व खासदार मनसेकडे एक आमदार राष्ट्रवादीकडे चार आमदार एक खासदार बहुजन विकास आघाडी कडे तीन आमदार सीपीएम एक आमदार अशी संख्याबळ आहे.
रायगडातील तीन आमदार शिंदे गटात गेल्याने शेकाप राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांना घेऊन सेना जिल्ह्यात नवीन समीकरण उद्याला आणू शकते सध्या रायगड जिल्हा परिषद शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे तीन पक्ष एकत्र आल्यावर भाजपा व बंडखोर सेना आमदारांना सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती हे तिन्ही पक्ष करू शकतात.
चमत्कार अगदी शेवटच्या शनी होऊ शकतो मग संकट कितीही मोठे असू द्या फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवायला या भरोशावर महाविकास आघाडी अवलंबून आहे तर बंडखोर सेना आमदार पैशाच्या ताकतीवर मतदारसंघातील कार्यकर्त्यांना आमिष दाखवीत आहेत मात्र बाळासाहेबांचा शिवसैनिक या आमिषाला बळी पडणार नाही आहे शिवसैनिक सांगताहेत तर मतदार संघातील उधार व आगाऊ रस्ते पूल साकव मोरया समाज मंदिर सामाजिक सभागृह यांची कामे केलेल्या कार्यकर्ते मात्र कर्जाच्या खाईत लोटत आहेत तेच कार्यकर्ते कम ठेकेदार या बंडखोर आमदार यांच्या पाठीशी असल्याचे चित्र आज मितीस सर्वत्र पाहण्यास मिळत आहे.