समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे चा OSD गोपीनाथ कांबळेचा प्रताप 420 कलम लागलेल्या संस्थेला खिरापत वाटून करोडोचा घोटाळा !!!!

जनदूत टिम    03-May-2022
Total Views |
नांदेड:- आंधळेपणाने समाजाच्या कल्याण खाते चालविण्याचा चँग बांधलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्री कार्यालयात ठेवलेल्या गोपीनाथ कांबळे सारख्या लाचार पी ए ला ठेऊन राज्यातील समाजाचे कल्याण करणार आहात की गोपीनाथ कांबळे चा उद्धार करणार आहेत.

munde
 
420 कलमान्वये कोर्टात कारवाई झालेल्या संस्थेला नांदेड जिल्ह्यातील.ता.देगलूर. येथे प्रेरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे, संचलित निवासी मूकबधिर विद्यालय चालते.या सस्थेचे सचिव मधुकर भास्करे हे शासनाचे अनेकदा दिशाभूल करुन आजवर शासकीय अनुदानाचा अपहर केला आहे. मा.आयुक्त अपंग कल्याण पुणे यांच्या दिनांक १०/०६/२०२० च्या आदेशा अन्वय प्रेरणा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित निवासी मूकबधिर विद्यालय देगलूर येथील बोगसपना उघड झाल्याने व गंभीर तूर्टी असल्याने या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली. अशाच महाराष्ट्रातील इतर शाळांची नोंदणी प्रमानपत्र(मान्यता) मा.आयुक्त अपंग कल्याण पुणे यांनी रद्द केली. मान्यता रद्द झालेल्या इतर सस्थेनी मा.मंत्री(सामाजिक न्याय) यांच्या न्यायालयात अपील केली असता मा.मंत्री( सामाजिक न्याय) यांनी सुनावणी घेतली. बैठक-२०२१/प्र.क.७२/दि.क.१/सा.न्य.व.वि.स.वि.म.मुंबई दिनांक०३/०९/२०२१ रोजी सुनावणी यादी तयार करून दिनांक ०९/०९/२०२१ रोजी सुनावणी घेतली. नंतर आदेश क.अपील-२०२१/प्र.क.३५/दि. क.१/सा.न्य.व.वि.स.वि.म.मुंबई ३२ दिनांक २४/०३/२०२२ रोजी च्या आदेशा अन्वय ज्या सस्थेवर आजवर कोणतेही न्यायालीन प्रकरने नसतील अश्या सस्थेला मान्यता देण्याचे आदेश परित करण्यात आले.
परंतू दिनांक०३/०९/२०२१च्या सुनावणी यादी मध्ये प्रेरणा शिक्षण प्रसारक मंडळ निवासी मूकबधिर विद्यालय देगलूर.जि.नांदेड या शाळेची सुनावणी यादी मध्ये नाव ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही नसतांना व कोणतीच या पुर्वी सुनावणी झाली नसतांना देखील सस्था अध्यक्ष मधूकर भास्करे हे बोगस पणे खोटी माहिती मा.मंत्री(सामाजिक न्याय) विभागास दिली.सस्थेवर न्यायालीन प्रकरणे नसल्याचे खोटी माहिती देऊन शासनाची दिशाभूल करीत मान्यता आदेश घेतले आहे.
या अगोदर देखील प्रेरणा शिक्षण प्रसारक मंडळ निवासी मूकबधिर शाळा देगलूर.जि.नांदेड या शाळेची मान्यता रद्द करुन दोनवेळा प्रशासक नेमण्यात आले होते.
नांदेड मधील भ्रष्टाचारी मधूकर भास्करे याच्या वर अनेक गंभीर गुन्हे नोंद आहे तर काही गुन्हात तो दोषी आढळून आल्याने फरार झाल्याचे (FRI) देगलूर पोलिस स्टेशन मध्ये नोंद आहे.
मधूकर भास्करे(सचिव) व त्याचा भाऊ जिवन
भास्करे(मुख्याध्यापक) या दोघा विरुद्ध कर्मचाऱ्याची शासकीय वेतन एकूण ४७ लाख रुपये कर्मचारी यांच्या वयक्तिक खात्यात जमा न करताच परस्पर उचलून शाळा बंद करुन फरार झाले असा गंभीर खटला देगलूर न्यायालयात चालु आहे.
मधूकर भास्करे नेहमीच बोगस कामे करीत असून यात विध्यार्थी पट बोगस कागदोपत्री दाखवुन शासकीय अनुदान उचलणे,कर्मचाऱ्याची शासकीय वेतन कर्मचारी यांच्या वयक्तिक खात्यात जमा न करताच परस्पर उचलून शाळा बंद करुन फरार होणे,वस्तीगृहात विध्यार्थी नसतांना देखील बोगस दाखवून शासकीय अनुदान उचलणे,शाळेवर नोकरीस घेतो म्हणून अनेक लोकाना लाखों रुपयाना गडवणे,असे अनेकदा बोगसपणा मधुकर भास्करे करीत असून शासनाची दिशाभूल करीत आहे.
बोगसपनाचा उघड दिनांक
०२/०२/२०२० मध्ये मा. मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. नांदेड यानी अच्यानक शाळेस भेट दिली असता अनेक गंभीर तूर्टी अडळुन आले ज्यात शासकीय रकमेचा मोठ्या प्रमाणात अपहर झाल्याचे करणे दाखवा नोटीस मध्ये उल्लेख आहे. तसेच सुगत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अंध विद्यालय देगलूर येथे मधूकर भास्करे हे सदस्य व शिक्षक असुन शाळेवर सत्तत गैरहजर असुन महिन्याला एकदा हजेरी पटावर सही करून बोगस मार्गाने शासकीय वेतन अपहर करीत आहे. मा.C.O जि.प.नांदेड यांनी दिनांक ०२/०२/२०२०अचानक शाळेस भेट देऊन सदरील बोगसपना उघड केले असून मुख्याध्यापक मारोती शिंदे व मधूकर भास्करे यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आली नाही.
धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातील लाचार आणि भ्रस्ट अधिकारी गोपीनाथ कांबळे यांच्या मेहरबानी मुळे मधूकर भास्करे हे नेहमीच बोगस काम करुन लाखों रुपयांची हेराफेरी करित आहे व वेळोवेळी शासनाची,अपंग मुलांची,कर्मचाऱ्यांची,दिशाभुल करुन मानसिक,अर्थिक, शारीरिक,त्रास देत असतो. शाळेतील सर्व कर्मचारी मधूकर भास्करे यांच्या विरुद्ध अनेक वेळा तक्रार आर्ज वरिष्ठ अधिकारी व पोलिस स्टेश यांना सामूहिक रित्या दिले आहेत तरी मधूकर भास्करे वशिला व पैसै खर्च करून सुटका करुन घेतो.
अशा पाखंडी माणसं विरुद्ध सकोल चौकशी करुन कठोर करवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.