माळशेज घाटातील टोकावडे हेदवली रस्त्याचे काम बोगसPWD चे उप. अभियंता सत्यजित कांबळे झाले ठेकेदारी भागीदार

जनदूत टिम    05-Apr-2022
Total Views |
माळशेज घाटातील टोकावडे हेदवली रस्त्याचे काम बोगस.....

PWD चा उपअभियंता सत्यजित कांबळे झाले ठेकेदारीत भागीदार ?

    बोगस कामांचा पाढा वाचताना मुरबाड तालुक्याची व्यथा काही संपेना! असेच चित्र दिसून येते. गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक वृत्तपत्रे सामाजिक नेत्यांनी या बोगस कामांच्या विरोधात आवाज उठवून सुद्धा त्याचा काहीएक परिणाम झाला नाही व प्रशासनाला जाग आली नाही. एकापाठोपाठ एक अशी बोगस कामे होत आहेत.MAL4
 
 
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागाने टोकावडे - ग्रामीण रुग्णालय ते हेदवली असे जोडरस्त्याचे  काम चालू आहे. या कामासाठी शासन रुपये 60 लाख खर्च करत असल्याचा अंदाजपत्रक आहे. आणि सदर रस्त्याचे काम अतिशय बोगस करण्यात आले आहे. अंदाजपत्रकात रस्त्याची खोदाई एक फुट करणे, खोदाई नंतर एक फूट डबर सोलिंग  करणे, त्यानंतर पाच इंच पीसीसी काँक्रेट करणे व एक फूट सिमेंट काँक्रेट m100 करणे. या सर्व बाबी करावयाच्या असताना देखील ठेकेदाराने यातील उर्वरित कुठल्याही बाबी न करता थेट फक्त सहा इंच सिमेंट काँक्रीटचेच काम केले आहे. संबंधित ठेकेदाराने खोदाई ,डबर सोलींग व पीसीसी न करताच फक्त सहा इंच काँक्रीट टाकला आहे. म्हणजे थेट अर्धा रस्ताच गिळल्या समान आहे. तर रस्त्याच्या मध्यभागात कॉंक्रिटचा अतिशय कमी प्रमाण वापरत ठेकेदाराने या रस्त्याच्या कामात सत्यजित कांबळे यांच्या भागीदारी ने मोठा भ्रष्टाचार केला आहे.

संबंधित बोगस कामाची तक्रार टोकावडे ग्रामपंचायतीचे उप सरपंच किरण पवार व ग्रामस्थांनी मिळून शाखा अभियंता चव्हाण यांच्याकडे केली पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तक्रारीकडे दुर्लक्ष करत मुजोर आणि भ्रष्टाचार करण्यात कांबळे ना साथ देणारा शाखा अभियंता चव्हाण यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

याचे मूळ कारण सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुरबाड चे भ्रष्ट उप अभियंता सत्यजित कांबळे हे ठेकेदारीत भागीदार असल्याची चर्चा आहे. अभियंता सत्यजित कांबळे यांनी तालुक्यातील अनेक कामांमध्ये अपहार केल्याच्या अनेक तक्रारी शासन दरबारी जाऊन सुद्धा त्यांच्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही.

अधिकारी ठेकेदार होणे म्हणजे "कुंपणच शेत खातय "असं म्हणणं काही वावगे ठरणार नाही. अशापद्धतीने कुंपणच शेत खायला लागले तर जनसामान्यांनी जायचं कोणाकडे असा प्रश्न निर्माण होतो. उप अभियंता सत्यजित कांबळे यांच्या भ्रष्ट कारणांम्याच्या अनेक बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केल्या आहेत पण तरीही जिल्हा प्रशासनाने उप अभियंता सत्यजित कांबळे यांच्या भ्रष्ट कारनाम्याना आळा घातला नाही.

     देशाला स्वातंत्र्य मिळवून कित्येक वर्षे उलटली तरीही देशाला कुरतडणारे ब्रिटिश अजूनही असल्याचा भास होतो. मुरबाड तालुक्यात भाजप, शिवसेना, काँग्रेस, अशा विविध पक्षांचे पुढारी एरवी आपल्या पक्षांचा तोहरा मिरवत फिरत असतात पण अशा बोगस विकासकामांच्या विरोधात आवाज उठवताना का दिसत नाहीत? दैनिक जनतेचा जनदूत सारख्या वृत्तपत्राला आशा मोठ्या बोगस कामांचा शोध घ्यावा लागतो ,आवाज उठवावा लागतो ही खंत म्हणावी लागेल

असंच चित्र जर मुरबाड तालुक्यात कायम राहणार असेल तर तालुक्याचा विकास होणार कधी? असा गंभीर प्रश्न निर्माण होतो. टोकावडे सारख्या दुर्गम भागातील लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन हे ठेकेदार व प्रशासकीय अधिकारी जनतेच्या पैशाची उघड उघड चोरी करत आहेत.

पण यांना जरब घालणारा तालुक्यात एकही नेता शिल्लक नाही. असंच म्हणावं लागेल. कारण सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी नेते कार्यकर्ते हे ठेकेदार असतात त्यामुळे "तेरी भी चूप, मेरी भी चुप" ही म्हणच त्यांनी पाठ केलेली असते या रस्त्याच्या कामा प्रमाणेच तालुक्यात अनेक बोगस कामे झाली आहेत .या सर्वांची चौकशी करणे गरजेचे आहे. जनतेच्या पैशाची उघड-उघड चोरी होत असताना.अधिकारी आपली मनमानी करत असताना सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी एवढे स्वस्थ का बसलेत याचा विचार जनतेने करणे गरजेचे आहे. टोकावडे - हेदवली या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असताना टोकवडे गावचे उपसरपंच किरण पवार व ग्रामस्थांनी तक्रार करून सुद्धा दखल घेतली गेली नाही याची खंत वाटते पण दैनिक जनतेचा जनदूत ह्या सगळ्या बोगस कामांचा पाठपुरावा करत राहील उप अभियंता सत्यजित कांबळे यांच्यासारख्या ठेकेदारी करणाऱ्या अधिकाऱ्यांची मनमानी जिल्हा प्रशासन ते राज्य प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत राहील