जिल्ह्यात आरोग्य केंद्र व उपकेंद्र नसलेल्या भागात लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील

जनदूत टिम    29-Sep-2021
Total Views |

  • आत्तापर्यंत ७८७१०३ लोकांचे लसीकरण पूर्ण

ठाणे / शहापूर : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण युद्धपातळीवर सुरु आहे. 16 जानेवारी 2019 पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ठाणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रात सर्वात प्रथम आरोग्य कर्मचारी त्यानंतर फ्रंट वर्कर चे लसीकरण केले. त्यानंतर 18 वर्षावरील वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले. त्या अनुषंगाने सद्यस्थितीत ग्रामीण व नगरपालिका कार्यक्षेत्रात 38 खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीम सुरू आहे व 174 शासकीय आरोग्य केंद्र व उपकेंद्र द्वारे तसेच 29 एन एच सी व्ही सी किंवा वर्कप्लेस सीव्हीसी द्वारे नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे.
 
covid-vaccine-_1 &nb
covid-vaccine-_1 &nb
 
27 सप्टेंबर 2019 रोजी पर्यंत ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रात केवळ शासकीय आरोग्य संस्थांमार्फत ५८६९०९ लोकांना पहिला डोस दिला गेला आहे.व दुसरा डोस २०4194 लोकांना दिला गेला आहे. असे एकूण ७८७१०३ लोकांना लसीकरण करण्यात आले आहे.भौतिक सामाजिक समस्यांच्या मर्यादा या लसीकरण मोहिमेत निर्माण होत असताना सुद्धा आरोग्य विभागाकडून ही मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. लसीचे प्रतिकूल परिणाम होत असल्याची भीती लोकांच्या मनात दिसून येते. पण यात घाबरण्यासारखं काहीही नाही कारण जिल्ह्यात फार कमी लोकांना लसीचे साईड इफेक्ट झाल्याचे दिसून आले आहेत. त्यामध्ये 28 लोकांना साधारण मळमळ होणे, ताप येणे किंवा अंग दुखणे या सारखे साधारण परिणाम जाणवले व आठ लोकांना चक्कर येणं दम लागणे असे गंभीर प्रतिकूल परिणाम दिसून आले.पण एक दोन तासांनी हे गंभीर स्वरूपाचे परिणाम असलेले लोक सुद्धा ठीक झाल्याचेही निदर्शनास आले. हे सगळे ऍलर्जीमुळे होत असल्याचे दिसून येते आहे. यात घाबरण्यासारखे घातक परिणाम नाही असे दिसून येते.
 
कोरोना प्रतिबंधात्मक बाबीसाठी लसीकरण हे अत्यंत महत्त्वाचे असल्याने जिल्हा परिषद ठाणे व जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ज्या भागात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र उपलब्ध नसेल तेथे लसीकरण केंद्र सुरू करण्याचा संकल्प आखला आहे.जेणेकरून ज्या भागामधील लोकांना लसीकरण करण्यासाठी इतरत्र जावे लागते ते आता थांबावे आणि त्या लोकांना जवळपास लसीकरण करता यावे यासाठी जिल्हा आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.असे जिल्हा आरोग्य अधिकारी मा. मनीषजी रेंघे व जिल्हा परिषद अध्यक्षा मा. पुष्पाताई पाटील यांनी व्यक्त केलं. मनुष्यबळ कमी असताना सुद्धा आरोग्य विभाग covid-19 च्या प्रतिबंधात्मकते साठी सदैव तत्पर आहे. तरी लवकरात लवकर सर्वांनी शासनाला सहकार्य करत लसीकरण करून घ्यावे असे विनंतीपर आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी मा.मनीषजि रेंघे यांनी केले आहे .तसेच ज्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र नसेल अशा भागात मा. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनुसार लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
 
तसेच मा.जिल्हाध्यक्षा पुष्पाताई पाटील यांनीसुद्धा लोकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले आहे.व लवकरात लवकर ज्या गावांमध्ये लोकसंख्या जास्त असेल आणि तिथे कुठल्याही प्रकारचे उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र नसतील अशा ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन व आम्ही प्रयत्नशील आहोत असे त्या म्हणाल्या.
लोकांनी अफवांना बळी न पडता लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे अशी माझी विनंती आहे
- मा.पुष्पाताई पाटील
( जिल्ह परिषद अध्यक्षा)

मनुष्यबळ कमी असतानाही प्रतिबंधात्मक उपाय योजना व लसीकरण युद्धपातळीवर सुरू आहे लोकांनी लवकरात लवकर लसीकरण करून प्रशासनाला सहकार्य करावे
- मा.मनिषजी रेंघे
जिल्हा आरोग्य अधिकारी