भिवंडीतील महिला सुरक्षा ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावासात अधिकारी

जनदूत टिम    28-Sep-2021
Total Views |
भिवंडी: भिवंडी तालुक्यातील अलिमघर गावातील माया पाटील उर्फ आरती आनंद बेळगली एका खेडेगावातील पोलीस कर्मचारी महिलेची विदेश मंत्रालय भारत सरकारच्या वतीने सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्यावर ऑस्ट्रेलिया येथे भारत सरकारच्या दूतावास (इंडियन एम्बेसी) आस्थापनेवरील सुरक्षा मिशनवर सोपविण्यात आली आहे.

police5500_1  H
 
या निवडीसाठी अनेक गुणवत्ता, इंग्रजी भाषेचे ज्ञान, वक्तृत्व, धाडसीपणा, मेहनत, प्रामाणिकपणा व निष्ठा इत्यादी गुणांसह, खेळ, वाहन चालविणे या कलागुणांची विचार केला जातो. या सार्‍या निष्कर्षावर आरतीने सिद्ध करून दाखविल्याने त्यांची निवड कौतुकास्पद असल्याने आगरी समाजातील केंद्रीय पंचायतराज राज्य मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. आगरी समाजातील विविध राजकीय पक्ष व समाजाच्या संघटनांनी त्यांच्या निवडीबाबत शुभेच्छांचा वर्षाव व कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.