प्रबोधनकार ठाकरेक्रीडा संकुलाचा जिम्नॅस्ट निशांत करंदीक़र भारतीय संघात

जनदूत टिम    26-Sep-2021
Total Views |
नवी दिल्ली : नुकत्याच इंदिरागांधी स्टेडीयमवर न्यू दिल्ली येथे यावर्षी जापान येथे होणाऱ्या ५० व्या जागतिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेकरीता सिनिअर गटासाठी व ढाका येथे होणाऱ्या सेंट्रलसाउथ आशिया जिम्नॅस्टिक्स स्पर्धेकरीता ज्युनिअर व सिनिअरगटासाठी भारतीय संघाचीनिवड करण्यात आली.
 

nishant_1  H x
 
यात भारतातील अनेक नामवंत खेळाडूंनी सहभाग घेतला होता.त्यात प्रामुख्याने भारताची पहिली ऑलिम्पिकपटुदीपा कर्माकर सोबत अरुणा रेड्डी, प्रणति दास , श्रध्दा तळेकर तर मुलांच्या संघात आशीष कुमार , राकेश पात्रा, योगेश्वर सारख्या अनेक नामवंत खेळाडूंनी आपलीउपस्थिति नोंदविली. यात आपल्यामहाराष्ट्राच्याही अनेक खेळाडुंचा समावेश होता.
 
या निवड चाचणी स्पर्धेतुन महाळुंगे/बालेवाडी पुणे येथील क्रीडाप्रबोधिनि मधून सराव करणाऱ्या श्रध्दा तळेकर या एकमेवमहाराष्ट्रच्या खेळाडुची निवड करण्यात आली. तिच्या सोबत तिचे प्रशिक्षक प्रवीण डगे सरांचेहीमहाराष्ट्र जिम्नॅस्टिक्स संघटने मार्फ़त अभिनंदन करण्यात आले.त्याचप्रमाणे २६ ऑक्टोबरपासुनढाका येथे सुरु होणाऱ्या‘सेंट्रल साउथ आशियाई जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत मुंबईतील विलेपार्लेच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडासंकुलातील निशांत करंदीकर याची पहिल्याक्रमांकावर निवड झाली असुन ही त्याची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा असणार आहे.
 
निशांत हा मुलांच्या गटातील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील पहिला खेळाडु आहे जोआंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल.निशांतच्या निवडीमुळे संकुलाचेअध्यक्ष अरविंद रमेश प्रभू व कार्यवाह मोहन राणे सर तसेच मुख्याधिकारी प्रीतमक़ेसकर यांच्या सहित संपूर्ण संकुलात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे.
 
निशांतने गेली ८ते १० वर्षे प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात प्रशिक्षक विशाल कटकदौड़ व नीलम बाबरदेसाईयांच्या मार्गदर्शनाखाली जिम्नॅस्टिक्सचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. आता तो पुढील स्पर्धात्मक प्रशिक्षणासाठीनुकत्याच प्रबोधनकारठाकरे क्रीडा संकुलात रूजु झालेले जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक शुभमगीरी यांच्या मार्गदर्शनाख़ाली जिम्नॅस्टिक्स या खेळाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षणघेत आहे.प्रशिक्षक शुभमगीरी यांचीही साउथ आशियाई स्पर्धत ज्युनिअरगटासाठी भारताच्या प्रशिक्षकपदी निवडझाली आहे. वडिल डॉ. रमेशय.प्रभू व आईडॉ. पुष्पाताई र.प्रभू यांच्याकल्पनेतून साकार झालेल्या मिशन ऑलिम्पिकचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, अशी आशा अध्यक्ष अरविंद दादा प्रभू यांनावाटते.
 
खेळाडूंना पुढेजाण्यासाठी योग्य ती मदत करण्यास समिति नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे व त्यामुळेच महाराष्ट्र राज्यजिम्नॅस्टिक्स संघटनेचे प्रमुख कार्यवाह मकरंद जोशी यांनीही राज्य संघटनेमार्फ़त क्रीडा संकुलाचेआभार मानले आहेत. यापूर्वी प्रबोधनकारठाकरे क्रीडा संकुलाच्या मुलींच्या गटातून वंदिता रावल , द्विजा आशर , श्रावणी वैद्य . उर्वि अभ्यंकर , अनुष्का पवार अशा अनेक खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे .