खासदार सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे अंगणवाडी सेविका, बचतगट महिलांना साहित्याचे वाटप

22 Sep 2021 10:15:56
पाली /गोमाशी : सुधागड पाली येथे खासदार सुनिलजी तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे १५७ अंगणवाडी सेविका तसेच बचत गट महिलांना सोमवार (ता.२०)रोजी विविध साहित्याचे वाटप आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
 
sunil_1  H x W:
 
रायगड जिल्हा महिला बालकल्याण विभाग यांच्या मार्फत बचत गटांचे उत्पन्न वाढवून त्यांचा उन्नतीसाठी 15 बचत गटांच्या सदस्यांना वेगवेगळ्या साधनांचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुधागड तालुका कडून रायगड जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा गीताताई पालरेचा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने व सुमधूर स्वागतगीताने करण्यात आले.अंगणवाडी सुपरवायझर म्हात्रे , प स.सदस्या साक्षीताई दिघे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर अनिकेतभाई तटकरे यांनी उपस्थितीतांना संबोधित केले.
 
यावेळी विधानपरिषद सदस्य अनिकेतभाई तटकरे,रायगड जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा गीताताई पालरेचा,पंचायत समिती गटविकास अधिकारी यादव ,तालुका अध्यक्ष रमेशजी साळुंखे, शहर अध्यक्ष अभिजीत चांदोलकर, युवक अध्यक्ष संदेश शेवाळे,पंचायत समिती सदस्या साक्षी दिघे, सुधागड तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा रुपाली भणगे,शहर अध्यक्षा सुजाता वडके, युवती अध्यक्षा अंकीता मोरे,रेखा साळुंखे,रुचिता बेलोसे, संगीता साखरले,स्नेहल दंत,आयोध्या शिंदे, सुलतान बेनसेकर,राजेश कानडे,दिनेश बुरूमकर अंगणवाडी सुपरवायझर आणि सेविका , बचत गटातील महिला सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0