जेएनपिटी च्या 6 कोटी रुपयांच्या सिएसआर फंडाचे वाटप

16 Sep 2021 11:34:00

  • लोकनेते दि.बा.पाटील इंजीनीअरींग काॅलेजसाठी रुपये 1 कोटी 80 लाख

उरण : जेनपीटी विश्वस्त मंडळाची मीटिंग जेएनपिटी ऍडमिनीस्ट्रेटीव्ह बिल्डींग येथे संपन्न झाली.त्यामधे जेएनपिटीचा एकूण 6 कोटीं रुपयांचा सिएसआर फंड वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्या पैकी 2 कोटी 5 लाख रुपये हे उरण तालुक्यासाठी देण्यात आले आहेत.तर उर्वरीत 3 कोटी 95 लाख उर्वरीत रायगड जिल्ह्यात वाटप होणार आहेत.त्यामूळे उरणकरांचा लोकनेते दि.बा. पाटील इंजीनियरिंग कॉलेजच स्वप्न साकार होणार आहे.
 
जेएनपिटी विश्वस्त कॉम.भूषण पाटील यांनी यासाठी विवीध मार्गाने आनेक महिने प्रयत्न केले होते.त्यासाठी त्यांना दुसरे कामगार विश्वस्त दिनेश पाटील यांचीही मोलाची साथ लाभली.शिवसेनेचे द्रोणागिरी शाखेचे अध्यक्ष जगजीवन भोईर यांनीही यासाठी विशेष प्रयत्न केले.यांसर्वांनी केलेल्या अथक प्रयत्नांना या बैठकीमध्ये यश आले आहे. या 6 कोटी पैकी 2 कोटी 5 लाख रुपये फंड उरण साठी तर उर्वरीत 3 कोटी 95 लाख उर्वरीत रायगड जिल्ह्या मधील निरनिराळ्या संस्थांना देण्यात आला.
 
jnpt_1  H x W:
 
उरण मध्ये देण्यात आलेल्या सिएसआर फंडापैकी लोकनेते दि.बा. पाटील इंजीनियरिंग कॉलेज साठी रु.1 कोटी 80 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.ते दरवर्षी रु.60 लाख प्रमाणे देण्यात येणार आहेत.तर भविष्यात अशीच मदत उरण मधील इतर खाजगी बंदरांकडूनही देण्यात येणार आहे. तसेच द्रोणगीरी स्पोर्ट्स आसोशिएशनला रु.15 लाख, महिलांना सॅनेटरी नॅपकीन साठी व सावरकर विद्यालय नविन शेवा साठी प्रसाधनगृह बांधण्यासाठी एकूण रु.10 लाख देण्यात येणार आहेत. यावेळी जेएनपिटी विश्वस्त भूषण पाटील यांनी हनुमान कोळीवाड्याच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थीत केला असता, जेएनपिटी चेअरमन संजय सेठी यांनी मिटींग घेउन सदर सोडविणार आसल्याचे संगितले.
 
जेएनपीटी च्या विश्वत मंडळाच्या झालेल्या बैठकीत उरण च्या लोकनेते दि. बा. पाटील इंजिनिअरींग कॉलेजला सी एस आर फ़ंडातून 1 कोटी 80 लाख रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावासाठी कामगार विश्वस्त दिनेश पाटील यांनी ही सहकार्य केले आहे. हा निधी मिळावा या करिता कॉम्रेड भूषण पाटील, दिनेश पाटील, जगजीवन भोईर यांनी शर्थीचे प्रयत्न करून अखेर भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिला आहे. शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या निस्वार्थी नेतृत्वात उरणच्या सर्व शेतकरी,कष्टकरी,वंचीत,बहुजन समाजाने केलेल्या सहभाग व संघर्षातून यश मिळाले. त्यानंतर येथील भूमिपुत्र मागील पाच दशकांपासून उच्च तांत्रिक शिक्षणासाठी धडपडत आहे. सिडकोने 1 रुपये भाड्याने अनेक शिक्षण सम्राटाना दिलेल्या भूखंडावरील संस्थेतुन आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना आरक्षण देण्याचे मान्य करून ही दिले नाही. त्यामुळे या संस्था मधून हजारो रुपये मोजत भूमीपुत्रांच्या मुलांना शिक्षण घ्यावे लागले. आजही घेत आहेत. उरण हा विकसित होणाऱ्या नवी मुंबईचाच एक भाग आहे.असे असतांनाही गेली 50 वर्षे उरण मधील विध्यार्थी उच्च तांत्रिक शिक्षणा पासून वंचीत आहेत. त्यामुळे येथील भूमीपुत्रांच्या जमिनीवर उभारण्यात येत असलेल्या अनेक प्रकल्पात नोकरीत प्राधान्य मिळत नाही. तर ज्यांची आर्थिक स्थिती मजबूत आहे.आशा हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या विद्यार्थांना याचा लाभ घेता आला आहे.
 
उरण सारख्या जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तालुक्याची ही शैक्षणिक दैन्यवस्था दूर करण्यासाठी उरण मधील सर्व पक्षीय नेते एकवटले. त्यांनी आपापसातील राजकीय मतभेद दूर सारले. आणि उरण तालुक्याच्या विकासासाठी उरण प्रकल्पग्रस्त सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून पहिला संकल्प हा उरण मध्ये इंजिनिअरिंग उभारण्याचा सोडण्यात आला. त्याकरिता संस्थेला उरण पनवेल मधील बड्या दानशूरंपासून ते सर्व सामान्यांनी सढळ हस्ते मदत केली. कॉलेज करिता सिडको कडून भूखंडही मिळवून घेतला. मात्र कॉलेजच स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवत संस्थेने उरण मधील केंद्र व राज्य सरकारच्या उद्योगांना त्यांच्या सी एस आर फ़ंडातून आर्थिक सहकार्य करण्यासाठी पत्रव्यवहार ठेवला. मात्र जेएनपीटी बंदरात कॉम्रेड भूषण पाटील व नंतर दिनेश पाटील या दोन्ही कामगार विश्वस्तांनी तसेच शिवसेनेचे द्रोणागिरी शाखाध्यक्ष जगजीवन भोईर यांनी सी एस फ़ंडातून निधी मिळावे यासाठी प्रयत्न केले.संस्था स्थापन झाल्यापासून जे एन पी टीचे विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील, विश्वस्त दिनेश पाटील, जगजीवन भोईर यांनी सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून संस्थेत सक्रिय राहून आपला सिंहाचा वाटा उचलला आहे.त्याबद्दल समस्त भूमीपुत्रांनी त्यांचे आभार मानले आहेत.
Powered By Sangraha 9.0