भुजबळांनी भटके विमुक्तांना मोफत अन्न धान्य पुरवठा केला तर येवल्याचा विकास झाला समजू

जनदूत टिम    06-Aug-2021
Total Views |

  • भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांची भुजबळांवर टीका

येवला : स्वतःला विकास पुरुष समजणार्या छगन भुजबळांनी गरिब भटके विमुक्तांना मोफत अन्न धान्य पुरविले तर आम्ही येवल्याचा विकास झाला असं समजू अशी टीका भाजपाचे माजी आमदार व भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी केली.
 
narendra55_1  H
 
पाच दिवसीय उत्तर महाराष्ट्र विभागीय दौऱ्यादरम्यान आज नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात त्यांचे आगमन झाले त्यावेळी पवार यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांवर निशाणा साधला. अनेक गरीब, कामगार व पीडितांना रेशनचे मोफत धान्य मिळत नसून अनेक ठिकाणी घोटाळे होत आहे पण शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले. नरेंद्र पवार यांचे येवला शहारामध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी व समाज बांधवांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
 
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दौऱ्यास सुरुवात करण्यात आली. उपस्थित सर्व पदाधिकारी व समाज बांधवांसोबत पवार यांनी संवाद साधला तसेच येवल्याचे विकास पुरुष म्हणवणाऱ्या भुजबळांनी येवला वासीयांना व विशेषतः भटके विमुक्त समाजाला मोफत अन्न धान्य पुरवठा केला तरी येवला तालुक्याचा विकास झाल्याचे समजले जाईल असे संबोधून भुजबळांच्या विकासाच्या गोष्टींना उत्तर दिले.
 
यावेळी भटके विमुक्त आघाडी युवती संयोजिका भाग्यश्रीताई ढाकणे, विभाग संयोजक श्री.नवनाथ ढगे, सहसंयोजक श्री.संपतराव नागरे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख श्री.प्रमोद परदेशी, येवला भाजपा नाशिक जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री.आनंद शिंदे, श्री.राजुभाऊ मोहारे, श्री.मिननाथ पवार, श्री.दिनेश परदेशी, येवला तालुका अध्यक्ष डॉ.नंदकिशोर शिंदे, भारतीय मजदूर संघाचे श्री.श्रावणदादा जावळे, श्री.सुधाकर तात्या पाटोळे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चेतन धसे, युवराज पाटोळे, मच्छिंद्र पवार, संतोष नागपुरे, विरेंद्र मोहारे, तालुका सरचिटणीस संतोष काटे, सागर नाईकवाडे, बंडू क्षिरसागर, शहराध्यक्ष तरंग गुजराथी आदि. पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.