भाजपा भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात

जनदूत टिम    05-Aug-2021
Total Views |

  • नाशिक ओझर दिंडोरीमध्ये कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी

नाशिक : भटके विमुक्त आघाडीची संघटनांत्मक बांधणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश संयोजक व माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली असून आज त्यांनी नाशिक शहर, नाशिक ग्रामीण, दिंडोरी व ओझर येथे दौरा करून कार्यकर्ते-पदाधिकारी यांच्या भेटी घेऊन अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली.

naresh55_1  H x 
 
सकाळी बापुसाहेब शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला मा. आमदार नरेंद्र दादा पवार, नाशिक पुर्व आमदार राहुल, डिकले, भाजप नाशिक शहर अध्यक्ष गिरीशजी पालवे, भटके-विमुक्त आघाडी महीला संयोजिका डॉ. उज्वलाताई हाके, उत्तर महाराष्ट्र संयोजक नवनाथ ढगे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी प्रदेश कार्यलयमंत्री राज खैरणार आदी उपस्थित होते. तर १० वाजता नाशिक शहर जिल्हा बैठकीमध्ये भटके विमुक्त पदाधिकारी यांना नरेंद्र पवार यांच्याहस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली.
 
यावेळी मा. आमदार नरेंद्र पवार, संयोजक भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश, लक्ष्मण सावजी, प्रदेश चिटणीस भाजपा,
केदार जाना आहेर जिल्हा अध्यक्ष भाजप, सुनिल बच्छव सरचिटणीस नाशिक जिल्हा, सुनिल केदार सरचिटणीस नाशिक शहर, शरद कासार नाशिक लोकसभा समन्वयक, डॉ. उज्ज्वला ताई हाके महिला संयोजिका भटके-विमुक्त आघाडी, भाग्यश्रीताई ढाकणे युवती संयोजिका भटके-विमुक्त, प्रदेश महिला सचिव रश्मी ताई जाधव आदी उपस्थित होते.
 
दुपारी २ वाजता आमदार देवयानी ताई फरांदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दुपारी ३ वाजता नाशिक विभागीय आयुक्त यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन भटके विमुक्त समाजाच्या विविध मागण्यांचे व योजनाचे निवेदन दिले. त्यानंतर नरेंद्र पवार ओझरकडे रवाना झाले. ४ वाजता ओझर येथील वैष्णव देवी मंदिरात दर्शन घेऊन ओझर येथे नरेंद्र पवार यांच्याहस्ते भटके विमुक्त महिला शाखेचे उद्घाटन व वृक्षरोपण करण्यात आले.
 
सायंकाळी ५.३० वाजता दिंडोरी तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत अवणखेड येथे भेट देऊन भाजप तालुका अध्यक्ष व आदर्श पुरस्कार प्राप्त सरपंच नरेंद्र जाधव यांच्या सत्कार व वृक्ष रोपण करण्यात आले. त्यानंतर दिंडोरी तालुक्यातील रामनगर तांडा येथे भेट दिली व सेवालाल महाराजांचे पवार यांनी दर्शन घेतले. यावेळी तांड्यातील समाज बांधवांसोबत संवाद साधून त्यांचे प्रश्न व अडचणीची माहिती घेतली.
 
यावेळी भाजप दिंडोरी तालुका अध्यक्ष नरेंद्र जाधव, भटके विमुक्त आघाडी प्रदेश युवती संयोजिका भाग्यश्री ताई ढाकणे, विभाग संयोजक नवनाथ ढगे, जिल्हा संयोजक रवींद्र गंगोळे, नाशिक जिल्हा महिला उपाध्यक्ष विद्याताई गोसावी प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी, कार्यलय मंत्री राज खैरनार व पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.