महाराष्ट्राचे कुलदैवत श्री काळभैवनाथ मंदिर क्षेत्र सोनारी येथे मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद आंदोलन

जनदूत टिम    30-Aug-2021
Total Views |
उस्मानाबाद : आज भारतीय जनता पार्टी च्या वतीने भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे कुलदैवत श्री काळभैवनाथ मंदिर क्षेत्र सोनारी येथे मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आले. ठाकरे सरकारने गेल्या पाच ते सहा महिन्यापासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करून ठेवली आहेत.
 
ghantanad_1  H
 
आता सर्व व्यवहार सुरळीत झाले असताना फक्त मंदिर बंद ठेवलेली आहेत. मंदिरावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीविकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होत आहे. त्यांना राज्यसरकार कसलीही मदत करत नाही आणि मंदिर ही उघडली जात नाही देशातल्या अन्य राज्यात मात्र मंदिर सुरू आहेत. म्हणूनच देव धर्मावर सातत्याने अन्याय करणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिर खुली करावे यासाठी श्रीकृष्ण जयंतीच्या व चौथ्या श्रावण सोमवार च्या पवित्र मुहूर्तावर भाजपा च्या वतीने श्री क्षेत्र सोनारी येथे शंखनाद आंदोलन करण्यात आले .
 
यावेळी भाजपा नेते सुखदेव टोपे, ॲड गणेश खरसडे, मनोहर मिस्किन,रामकृष्ण घोडके, श्रीमंत शेळके, अरविंद रगडे, अजित काकडे,विलास खोसरे,तुकाराम हजारे,राहुल जगताप, शरद कोळी, ॲड. लक्ष्मण कोकाटे, भाग्योदय देशमुख, श्रीकृष्ण कोकाटे,अमोल गोफने, विनोद पाटील,नागेश गर्जे,पिंटू नलवडे, हनुमंत गाढवे,विजय कुलकर्णी, अमर गोडगे ,राहुल काळे, शिवानंद तळेकर आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.