माणूसपण जपणारा उद्योजक - अनीलशेठ मानिवडे

जनदूत टिम    30-Aug-2021
Total Views |
अनेकांचा जीवन प्रवास अभ्यासताना अनेकदा कुतूहल निर्माण होत असतं. शून्यातून साम्राज्य उभं करणं फार कठीण असतं. मग ती वाटचाल कुठल्याही क्षेत्रातील असो. राजकीय असो, सामाजिक असो, किंवा व्यावसायिक असो प्रत्येक गोष्टीत संघर्ष हा असतोच. असंच वासींदच्या यशोभूमित घडलेला एक उद्योजक म्हणजे अनिल शेठ मानीवडे हा आहे. अनिल शेठ मांनीवडे अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेले एक व्यक्तिमत्व आहे.
 
anil_1  H x W:
 
शिक्षणाची अन् समाजकार्याची कास त्यांना लहानपणापासून होती. ते म्हणतात ना देणाऱ्याला देव कधीच कमी पडू देत नाही. कदाचित अनिल शेठ मांनीवडे यांचे दातृत्व पाहून परमेश्वराने त्यांना भरभरून अशी यशश्री दिली आहे. अनिल शेठ मानीवडे यांनी अतिशय सामान्यातून व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला तुटपुंजा आर्थिक परिस्थितीतून छोटी मोठी कंत्राटे घेत असत. हळूहळू अनिल मनिवडे यांची आर्थिक परिस्थिती सुधारत गेल. अनेकदा अनेक अडचणी समोर उभ्या ठाकल्या पण हा माणूस कधीच थांबला नाही. प्रत्येक अडचणीतून वाट काढत अनिल मानीवडे यांनी बांधकाम क्षेत्रात शिखर गाठले वयाच्या अगदी 24 व्या वर्षापासून त्यांनी बांधकाम क्षेत्रात एक साधा कंत्राटदार म्हणून सुरुवात केली. पण आज पर्यंत त्यांनी दहा ते बारा संकुल बनवली आहेत. प्रत्येक संकुलाचे बांधकाम हे अतिशय दर्जेदार पद्धतीने उभ केल आहे. स्वतः बांधकाम इंजिनीयर म्हणून शिक्षण असल्याने त्यांना बांधकाम क्षेत्रातील अतिशय सूक्ष्म माहिती आणि अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या बांधकामात सुंदर्ता आणि पद्धतशीर पणा पाहायला मिळते.
 
मानिवडे यांनी एक उत्कृष्ट व्यवसायिक म्हणून स्वतःची ओळख केली आहे त्याच प्रमाणे त्यांना समाजसेवेची देखील प्रचंड ओढ आहे म्हणून त्यांनी 2001 पासून श्रीराम मित्र मंडळ स्थापन केले. या मंडळाच्या माध्यमातून ते अनेक आरोग्य शिबिर, मोतीबिंदू शिबिर, वह्या वाटप कार्यक्रम, राबवत असतात त्याप्रमाणेच किन्हवली येथील कर्णबधिर विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांना दत्तक घेतलं यावरून त्यांच्यातला माणूसपनाच दर्शन लाभत . इतके संवेदनशील व्यवसायिक फार कमी लाभतात. कोरोना च्या महामारीत अनेक परप्रांतीय आपला उध्वस्त झालेला संसार डोक्यावर बांधून मायभूमीकडे पायी निघाले होते. डोळ्यात अश्रू अन् फक्त जगण्याची इच्छा असणार्या त्या वाटसरूंना भुकेल्या अवस्थेत पाहून अनिल मानीवडे यांचे डोळे पाणावले आणि त्यांनी त्या हायवेने जाणाऱ्या प्रवाशांना पोळी-भाजी देऊन त्यांच्यातली माणुसकी जिवंत ठेवली.
 
कोरोनाच्या महा मारीत कोणत्याच कोरोना संक्रमित व्यक्तीला हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्यासाठी कुणीही तयार होत नसत अनेक गरीब गरजू लोकांना कोरोना संक्रमित झाल्यावर हॉस्पिटल पर्यंत पोहोचायला फार कठीण होतं. अशा परिस्थितीत अनिल मानी वडे यांनी स्वतःच्या जीवाची कधीच पर्वा न करता त्या कोरोणा संक्रमित पेशंट्सना स्वतःच्या गाडी मध्ये टाकून हॉस्पिटल पर्यंत नेलं त्या गरीब गरजूंना रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळवून देण,त्यांना बेड उपलब्ध करून देणे, इथपर्यंत त्यांनी सहकार्य केलं गरीब गरजू पेशंटसाठी मोफत सिटीस्कॅन करून दिले वाशिंद पी एससी सेंटरला त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पी पी किट औषध फवारणी पंप दिले ग्रामपंचायत वासिंद यांना देखील त्यांनी औषध फवारणी पंप दिले.
 
अनिल शेठ मानिवडे यांचं शिक्षणक्षेत्रात देखील अतिशय मोठं काम आहे. त्यांनी उत्कर्ष महाविद्यालयाची स्थापना केली ते संस्थापक संचालक झाले. त्यानंतर त्यांनी त्याच विद्यालयाचे अध्यक्षपद भूषवलं आणि सध्या ते त्या विद्यालयाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. रोटरी क्लब ऑफ शहापूर चे देखील ते मेंबर आहेत त्या रोटरी क्लबच्या माध्यमातून देखील ते शहापूर तालुक्यात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. अनिल शेठ मनीवडे हे वाशिद मध्ये अतिशय कौतुकास्पद तुळजा सैरनेटी ग्रिल्स नावाचा असा बांधकाम प्रकल्प उभा करत आहेत. वासींदमध्ये जवळजवळ 250 फ्लॅट्स असलेला संकुल उभा करत आहेत. त्यामध्ये वाशिद मध्ये प्रथम च ते क्लब हाऊस, जिम इंडोर गेम, आउट डोअर गेम, सोलर सिस्टिम, स्केटिंग रिंग, गार्डन अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देत आहेत. वाशिद मध्ये अशा सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असा हा पहिला प्रकल्प असणार आहे.
श्री अनिल शेठ मानिवडे
यशस्वी उद्योजक व समाजसेवक
शिक्षण डिप्लोमा इन सिव्हिल अँड डिप्लोमा इन एस आय.
अनिल शेठ मानिवडे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा