आदिवासी महिला भूसंपादनाच्या मोबदल्याच्या प्रतीक्षेत

हरेश साबळे    17-Aug-2021
Total Views |
डोळखांब : मुंबई नागपुर समृद्धी महामार्गात जमीन संपादित झाल्यानंतर जवळपास काम पूर्ण होत आले तरी भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने बिरवाडी येथील आदिवासी महिला स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणास करणार होती.परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने लेखी आश्वासन दिल्याने अखेर हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
 
adivasi_1  H x
 
समृद्धी महामार्गातन शहापुर तालुक्यातील शेकडो एकर जमिन भूसंपादित झाली.त्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मिळाला नाही.तालुक्यातील बिरवाडी येथील बिबलवाडी या आदिवासी वाडीतील आदिवासी महिला सखुबाई महादू वाख यांचे 74 गुंठे क्षेत्र समृद्धीमहामार्गासाठी संपादित करण्यात आले होते.काम पूर्ण होत आले तरीही ही महिला अजून मोबदलाच्या प्रतीक्षेत होती.परंतुआज तागायत मोबदला मिळाला नाही.
 
अखेर या महिलेने काँग्रेस सेवादल शहापूर तालुका अध्यक्ष दशरथ भोईर यांच्याकडे विषय मांडल्याने त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देत उपोषणाचे पत्र दिले.जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मध्यस्थीने मोबदला देण्याचे लेखी आश्वासन घेतल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश भांगरथ,राजेश पडवळ,नितेश विशे,राकेश पाटील प्रमोद निमसे आदी उपस्थित होते.