मालाधारी मित्र मंडळ सहार रोड कोलडोंगरी अंधेरी तर्फे पूरग्रस्तांना एक हात मदतीचा

जनदूत टिम    17-Aug-2021
Total Views |
पाली/गोमाशी : महाड तालुक्यातील बिरवाडी व सवाद या गावांत २२ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे महापूर आला होता. त्या महापुराने तेथील जनजीवन विस्कळीत झाले या पूरग्रस्तांना मालाधारी मित्र मंडळ अंधेरी कडून शनिवारी(ता .७ )रोजी जीवणाआवश्यक वस्तूचे वाटप केले . त्या वेळी आम्ही तिथे प्रत्यक्षात गेलो तेव्हा काही ठिकाणी १५ ते २० फूट पाणी भरल्याचे फोटो, व्हिडीओ तर काही घरांमध्ये घरांच्या छपरांपर्यंत पाणी भरल्याच्या खुणा व घरांतील सामानांचे नुकसान बघून आम्ही आमच्या कल्पना शक्ती पलीकडे जाऊनदेखील विचार करू शकत नव्हतो तेथील ग्रामस्थांनी कशा प्रकारे आपले जीवन, आपलं सर्वस्व वाचविण्याचा प्रयत्न केला असावा.
 
pali_1  H x W:
 
परिस्थिती किती भयावह होती याचा आपण अंदाज देखील बांधू नाही शकत. आम्ही या पूरग्रस्त ग्रामस्थांना एक हात कर्तव्याचा एक हात माणुसकीचा या उद्देशाने दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांच्या आयुष्यात त्यांना पुन्हा त्याच मानसिक ताकदीने उभे राहण्यासाठी आमच्यापरीने जो काही छोटासा खारीचा वाटा उचलला त्याने मनाला एक समाधान लाभले
.
आपण माणुसकीच्या समाजात जन्माला आल्यावर संकटकाळी माणसांच्या आपल्या क्षमतेप्रमाणे कामी आलो याचं आम्हाला समाधान मिळालं. या मदत कार्यात जे आम्ही युवक या पूरग्रस्त ठिकाणी गेलो त्या व्यतिरिक्त आमच्या मंडळातील इतर अनेक युवक व त्यांचे परिवार, मित्र मंडळी, नातेवाईक यांनी आम्हाला अगदी कमी वेळात पैसेरुपी मदत करून आम्हाला सहकार्य केले. त्यांच्या या सहकार्य व मार्गदर्शनामुळे आम्ही घेतलेली हि जबाबदारी उत्तमरित्या पार पाडू शकलो. आपण सर्वांनी केलेल्या मदत व सहकार्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभार व्यक्त करतो.
 
ज्यांनी आम्हांस या पूरग्रस्त गावी जाऊन हि मदत कार्य व्यवस्थितरित्या पार पाडण्यास मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले असे नांदवी कुंभारवाडा गावाचे राजेश म्हाप्रळकर व निवृत्ती नांदवीकर यांनी आम्ही पूरग्रस्त ठिकाणी जाण्यापूर्वी स्वतः जाऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला व त्यापद्धतीने आयोजन करून दिलेली भेटवस्तू ग्रामस्थांपर्यंत कशी पोहचेल याचे पूर्वनियोजन केले. आपल्या या मदत कार्यात ते देखील पूर्ण दिवस आमच्या सोबत राहून आम्हांस जे सहकार्य केले त्यासाठी आम्हा सर्वांतफे त्याचे मनःपूर्वक आभार. त्यांच्या शिवाय हे मदत कार्य व्यवस्थितरित्या पार पाडणे शक्यच नव्हते. आम्हा युवकांस या मदतकार्यात आपण सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.
 
तसेच आमच्या सारखी अनेक मंडळ, संस्था, व्यक्ती यांनी देखील या पूरग्रस्त गावांना आपआपल्या परीने सहकार्य केले त्यांच्या या माणुसकीला आमचा सलाम. पैसा, पद, नाव, प्रतिष्ठा, धन दौलत हे सर्व अजूनही दुय्यम स्थानावर आहे, प्रथम स्थानावर फक्त माणुसकीच आहे जी समाजात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी व ते जन्मापासून मृत्यूपर्यंत व त्यानंतर आठवणींमध्ये कायम स्वरूपी टिकवण्यासाठी आपल्या अंगी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.या पूरग्रस्त सर्व गावांतील ग्रामस्थांचे जीवन पुन्हा लवकरात लवकर पूर्ववत व्हावे व मागील काळ विसरून पुन्हा उत्तम, निरोगी व भरभराटीच्या आयुष्याला सुरुवात करावी .