कैलास महाराज निचिते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

हरेश साबळे    17-Aug-2021
Total Views |
डोळखांब : कल्याण तालुक्यातील अजिंक्य अकादमीतर्फे देण्यात येणारा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू ह भ प कैलास महाराज निचिते आणि त्यांचे शिष्य शिवाजी सातपुते याना देण्यात आला तर शब्दरत्न पुरस्कार कवी संदीप कांबळे याना देण्यात आला.हा पुरस्कार सोहळा वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पाषाने या ठिकाणी मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.कैलास महाराज निचिते यांनी वारकरी युवक संघटना स्थापना करून समाजकार्यास सुरुवात केली.त्यांनी किर्तनांच्या,प्रवचनाच्या माध्यमातून या संघटने अंतर्गत वारकरी प्रणाली उत्थान आणि उत्कर्षासाठी प्रयत्न केले.
 
Dolkhamb_1  H x
 
लहान मुलांनाही वारकरी सांप्रदायाची गोडी लावण्यासाठी विद्यापीठ स्थापन करून मोफत आश्रम सुरू केले.उद्याचे तरूण व्यसनाकडे,अनैतिकतेकडे वळणार नाहीत.हाच निर्मळ उद्देश ठेवून शिक्षणाबरोबर अध्यात्मिकतेकडे वलवळे.सोबत वारकर्यांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी विविध आंदोलनांच्या माध्यमातून परिसरातील जनतेच्या विविध समस्यांचे निराकरण केले आहे.वाशिंद -आसनगाव दरम्यान असलेले वेहळोली रेल्वे स्टेशन व्हावे ही मागणी लावून धरली. स्थानिक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण जवळच्या महाविद्यालयामध्ये मिळावे म्हणून प्रयत्न केले.आता गरज आहे.
 
आपली संस्कृती ,धर्म जपणार्या ह.भ.प.कैलास महाराज निचिते यांनी वारकरी गुरूकूल व वारकरी शिक्षण संस्था स्थापन करून शहापुर ,वाडा व पालघर या भागातील कलाकार,कीर्तनकार ,गायक,वादक घडविण्याचे कार्य करत आहेत.जसे आपल्या आई-वडिलांना वाटते कि, जे आपण सोसलय ते मुलांनी नको.याच जाणिवेतुन ह.भ.प.कैलास महाराज निचितेंनी आपल्या परिसरातील मुलांना जणु आळंदी ला जाण्या ऐवजी ज्ञान गंगा परिसरात आणून ठेवण्याचे महान कार्य केल्याने त्याना यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.