सांगली शहरातील सावली बेघर - निराधार आश्रमात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या वतीने आरोग्य शिबीर व अन्नधान्य किट वाटप

जनदूत टिम    12-Aug-2021
Total Views |

  • शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार आरोग्य शिबीरांचे आयोजन

सांगली : सांगली शहरातील इंसाफ फौंडेशन संचलित सावली बेघर - निराधार निवारा केंद्र चालविले जाते. येथे बेघर लोकांना विनामूल्य आश्रय दिला जातो तसेच त्यांच्या नाष्टा - जेवण पासून राहण्यापर्यंत सर्व सोयी सुविधा पुरवल्या जातात आणि त्यांना त्यांचं हक्काचं घर दिल जात.
 
shrikant44_1  H
 
नुकतेच सावली बेघर - निराधार निवारा केंद्रामध्ये शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि खा.डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या सुचनेनुसार शिवसेना वैद्यकीय मदत तथा डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनद्वारे संपूर्ण आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यात एकूण ६९ जणांची आरोग्य तपासणी करून ज्यांना आवश्यक अशा बहुतेक निराधार बांधवाना TT धनुर्वात इंजेक्शन देण्यात आले.
 
यावेळी श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मा.श्री.संभाजी भिडे (गुरुजी ) यांच्या शुभहस्ते सावली मधील सर्व निराधार बांधवासाठी अन्न धान्य किटचे देखील वितरण करण्यात आले. यावेळी श्री भिडे गुरुजी यांनी सावली निवारा सांभाळणारे इंसाफ फौंडेशनचे श्री मुस्तफा मुजावर यांचा शाल, श्रीफळ देऊन विशेष सन्मान केला. माणुसकीचा धर्म जपणाऱ्या श्री मुस्तफा मुजावर यांच्यासारखे तरुणांची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन श्री भिडे गुरुजी यांनी यावेळी केले. तसेच, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून पूरग्रस्त महाड - चिपळूण - सांगली - कोल्हापूर येथे गेली सलग 15 दिवस आरोग्य सेवा देणाऱ्या डॉ.जे.बी.भोर सर यांचा सत्कार केला.
 
यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे , सावली निवारा केंद्राचे सर्वेसर्वा श्री मुस्तफा मुजावर, शिवसेना वैद्यकीय सहाय्यक सर्वश्री सागर झाडे, नितीन हिलाल, रविंद्र ननावरे, प्रसाद सूर्यराव, रोहित वायभासे, राहुल भालेराव, राजाभाऊ भिलारे, भारत गोपाळ, ऋषिकेश देशमुख, राम राऊत, माऊली धुळगंडे, अरविंद मांडवकर, शिवकांत निषाद, स्वरूप काकडे, दीपाली चव्हाण, गोविंदा कुमार तर शिवसेनेचे श्री नानासाहेब शिंदे, डॉ किशोर ठाणेकर यांच्यासाहित श्री प्रसाद रिसवडे, निखिल शिंदे, रफिक मुजावर, वंदना काळेल, स्वप्नील शिंदे, आदी जण उपस्थित होते.