नरेंद्र पवार यांनी कल्याणकरांच्या वतीने मंत्री कपिल पाटील यांचा केला दिल्लीत सत्कार

जनदूत टिम    08-Jul-2021
Total Views |
भिवंडी : तालुक्यातील दिवे अंजूर गावाचे सरपंच म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करून पंचायत समिती, जिल्हा परिषद,
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही भूषवून भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणून प्रभावीपणे काम करणारे मा.कपिल पाटील साहेब यांची देशाच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी निवड केली हा आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे.

kapil44_1  H x  
 
मा.कपिल पाटील साहेबांचे अभिनंदन करण्यासाठी आज दिल्ली येथे जाऊन त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी आज दिल्ली येथे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार तथा केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री श्री.कपिलजी पाटील यांची भेट घेऊन केंद्रीय मंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी सोबत जिल्हा सरचिटणीस श्री.अर्जुन म्हात्रे, श्री.संतोष शिंगोळे, श्री.गौरव गुजर, श्री.स्वप्नील काटे, डॉ.पंकज उपाध्याय, श्री. सुनिल पांडे, श्री अभिजित दुर्वे आदि. पदाधिकारी उपस्थित होते.