अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासन सहकार्य करेल - पालकमंत्री दादाजी भुसे

21 Jul 2021 12:10:30
पालघर : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात तसेच पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे ह्या पावसामध्ये अनेक भागातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी जिल्हा प्रशासन सहकार्य करणार असे कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. नंदाडे (सफाळे) येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घराची पाहणी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यांनी केली यावेळी परिसरातील नागरिकांशी चर्चा करताना पालकमंत्री भुसे बोलत होते.
 
bhussss_1  H x
 
या अतिवृष्टीमुळे बऱ्याच नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे यावर उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. धोकादायक परिसरातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत असे पालकमंत्री यांनी सांगितले. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नुकसानग्रस्त भागाची पहाणी करून स्थानिक नागरिकांची विचारपूस करून त्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत निर्देश यावेळी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ तसेच वरिष्ठ अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0