वात्सल्य संस्थेचे काम प्रेरणादायी - निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी

जनदूत टिम    19-Jul-2021
Total Views |
मंगरूळ : कोरोनाच्या काळात सामाजिक संस्थांची जबाबदारी वाढली आहे.अशा प्रसंगी वात्सल्य सामाजिक संस्थेने केलेले कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे,असे मत निवासी उपजिल्हाधिकारी श्री.शिवकुमार स्वामी यांनी वात्सल्य सामाजिक संस्थेस दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी व्यक्त केले.
 
vastlae55_1  H
 
समाजात चांगले काम करणाऱ्या संस्थांच्या पाठीमागे समाज खंबीरपणे उभा राहतो.वात्सल्य संस्था अनेक सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे,संस्थेच्या भविष्यकालीन वाटचालीत प्रशासनाच्या सहकार्याने उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करू असे मत श्री.स्वामी यांनी यावेळी व्यक्त केले.
 
याप्रसंगी संस्थेच्या परिसरात पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले,गोशाळेतील गोमातांचे पूजन करून चारा भरवण्यात आला तसेच एकल महिलांना साडीची भेट देण्यात आली,नव्यानेच बांधण्यात आलेल्या बहुउद्देशीय सभागृहाची पाहणी करण्यात आली.यावेळी पालकमंत्री यांचे स्वीय सहाय्यक श्री.श्रद्धानंद माने पाटील,संस्था पदाधीकारी,कार्यकर्ते उपस्थीत होते.