खरंच देवेंद्रजी तुस्सी ग्रेट हो

पांडुरंग (अण्णा) पवार    18-Jul-2021
Total Views |
छगन भुजबळ यांनी मा.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे कारण काय तर OBC समाजाचे रद्दबातल झालेले राजकीय आरक्षण पुन्हा कसे मिळवता येईल ? OBC आरक्षण पुन्हा मिळवून देउनच निवडणुकीला सामोरे जावे लागेल अन्यथा OBC समाज मतदान देण्याऐवजी हातात जोडा घेउन सत्कार करेल हे छगन भुजबळ यांच्यासकट राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा नेत्यांना चांगलंच माहीत आहे, छगन भुजबळ यांनी मा.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याने एक राजकीय वादळ निर्माण होऊ शकते असे असतानाही ते मा.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात याचा स्पष्टपणे अर्थ असा आहे की ही भेट त्यांनी त्यांच्या सर्वेसर्वा नेत्यांच्या पूर्वपरवानगीनेच घेतली आहे.....असो.
 
devendra-fadnavis-192_202
 
मुद्दा हा नाही की राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी OBC राजकीय आरक्षण या ज्वलंत प्रश्नांवर मा.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तर मुद्दा हा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वतःला OBC आरक्षणासाठी हरसंभव प्रयत्न करत आहोत असे दाखवण्याचा अभिनय सुरू आहे...ज्याची योग्य प्रसिद्धी केली जातेय , राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांना चांगले माहीत आहे की OBC चे राजकीय आरक्षण आपल्याच महाविकास आघाडी सरकारने दुर्लक्ष करून घालवले आहे ते पुन्हा मिळवण्यासाठी जो अभ्यास करावा लागतो तो केला नाही परिणामी निवडणुकांच्या तोंडावर त्यांची मोठी गोची होणार आहे.
 
मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सुद्धा असाच प्रकार आहे,केवळ न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना जो समन्वय असावा लागतो तोच नव्हता, याबाबत अनेकदा वकिलांनी जाहीरपणे आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे पुढील तारीख घ्यावी लागल्याचे वक्तव्य केले होते शेवटी न्यायालयात योग्य बाजू मांडता आली नाही आणि मराठा आरक्षण रद्दबातल ठरले.
 
आपण कोणीतरी दिव्य घराण्यातील महापुरुष आहोत असा अहंकारयुक्त समज असलेले शेणा नेतृत्व मराठा आरक्षण मिळण्यासाठी देवेंद्रजीनी पुढाकार घ्यावा असे म्हणतात स्वतःला OBC समाजाचे मसीहा समजणारे छगन भुजबळ मा.देवेंद्र फडणवीस यांना भेटुन obc चे राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी चर्चा करतात... मराठा आरक्षणाचा प्रश्न विचारताच गर्भगळीत झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री जयंत पाटील म्हणतात फडणवीसांनी सत्तेत यायची गरज नाही फक्त आम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा मार्ग सांगा अशी जाहीर याचना करतात.
 
वडिलोपार्जित पुण्याई ने सत्तेवर आलेले शुशेणा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वतःच्या अभ्यासावर नेता बनलेल्या मा.देवेंद्र फडणवीस यांच्या समोर अगदीच खुजे दिसत आहेत,सत्तेतून हप्ता वसुलीचा लळा लागलेल्या या नेत्यांच्या बुडाखाली सत्तेची खुर्ची आहे हातात निर्णयाचा कागद अन अधिकारांचा पेन तर आहे मात्र त्या कागदावर काय मायना लिहायचा याचा अभ्यास नसल्याने मराठा व OBC समाजाचे तसेच एकूणच महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान होत आहे. याप्रसंगी सर्व सामान्य नागरिकांना,शेतकरी व सगळ्याच समाजघटकांना देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा गरज भासते आहे....खरंच देवेंद्रजी तुस्सी ग्रेट हो.