कल्याणची आकाशपरी २० जुलै रोजी घेणार अवकाश भरारी

जनदूत टिम    15-Jul-2021
Total Views |

  • संजल गावंडे हिची अमेरिकेतील न्यू शेपर्ड यानासाठी निवड

कल्याण :  कल्याण पूर्व कोळशेवाडीतील संजल अशोक गावंडे या तरुणीची अमेरिकेतून लाँच होणाऱ्या यानातील टीममध्ये निवड झाली आहे. संजल गावंडे हिने कोळशेवाडी (कल्याण पूर्व) ते सातासमुद्रापलिकडे अमेरिकेत मिशिगन, शिकागो, कॅलिफोर्निया आणि आता सियाटेल असा प्रवास करणारी ही तरुणी आकाशपरी नावाने ओळखू लागली आहे.
 
sanjal_1  H x W
 
अमेरिकेत सियाटेल येथील ब्ल्यू ओरिजीन या एरो स्पेससाठी नामंकित कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीतर्फे २० जुलेला न्यू शेपर्ड हे यान लाँच होत असून त्यामधून अब्जपती जेफ बेझोसही अवकाश सफर करणार आहेत. या मिशनसाठीच्या टीममध्ये संजलची निवड झाली आहे. कल्याणमध्ये जन्मलेली संजल कोळशेवाडीतील एका इंग्लिश हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत, बारावीपर्यंतचे शिक्षण बिर्ला कॉलेज, तर १२ वीनंतर वाशी येथील महाविद्यालयात शिक्षण घेत २०११ ला संजलने मुंबई विद्यापीठामधून मॅकेनिकल इंजिनियरची पदवी प्राप्त केली. हा अभ्यासक्रम पार पाडतानाच तिने जीआरई, टोफेलसारख्या परिक्षा उत्तीर्ण झाली. मिशिगन टेक युनिव्हर्सिटीमध्ये २०१३ ला पास होवून संजलने मॅकेनिकलमध्ये पदवी प्राप्त केली.
 
२०१३ ला संजलला विस्कानसिनमधील नामांकित कंपनीत नोकरी लागली. तिच्या मनासारखा तिला जॉब मिळाला. पंरतु तिचे लक्ष मात्र अवकाशाकडे होते. ती जमिनीवर शांत बसणारी मुलगी नव्हती. नोकरी करता-करता शनिवार-रविवार सुटीमध्ये विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. विमान शिकण्यासाठी तिचा मॅकेनिकल अभ्यासक्रम कामी आला. २०१६ मध्ये तिला वैमानिकाचे लायसन्स मिळाले. कॅलिफोर्नियामधील कंपनीत मॅकेनिकल डिझाईन इंजिनियर म्हणून कामाला सुरूवात झाली. संजलला २०१८ ला व्यावसायिक पायलटचे लायसन्स मिळाले.
 
२० जुलैला लाँच होत असलेल्या न्यू शेपर्ड या यानातील टीममध्ये निवड झाल्याने संजलचे तिचे लहानपणापासूनचे जे स्वप्न होते, ते खऱ्या अनि पूर्ण झाले आहे. लहानपणापासून गगनाला गवसणी घालण्याचे जे ध्येय होते, ते आता खऱ्या अनि पूर्ण होत आहे.
-सुरेखा गावंडे, सेजलची आई