शिवसेनेच्या दणक्याने महावितरण वठणीवर ..!!

14 Jul 2021 19:18:04
शहापूर : शहापूर महावितरण कार्यालयाच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त असलेल्या जनतेला न्याय देण्यासाठी दि.१५ जुलै २०२१ रोजी पुकारण्यात आलेले घेराव आंदोलन महावितरणचे कार्यकारी अभियंता मा.श्री.रामटेके साहेब आणि कटकवार साहेब यांनी मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे स्थगित करण्यात येत आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे आठ दिवसांत निराकरण करून नागरिकांना न्याय दिला जाईल असे लेखी आश्वासन संबंधित अधिकारी यांचेकडून देण्यात आले.
त्यानुसार १) गणेशवाडी येथील सडलेला पोल बदलणे व लघुदाब विद्युत वाहिनी खेचून घेणे.

shiv4458_1  H x 
 
२) ज्ञानेश्वरनगर येथील लघुदाब विद्युत वाहिनी खेचून घेते व गरज पडल्यास वाढीव पोल उभे करून देणे.
३) झगडेनगर येथील रोहित्राचा धक्का बनवून देणे.
४)ठक्कर कंपाऊंड, कळंभे येथील रोहित्राची देखभाल दुरुस्ती करून देणे.
५) डोंबिवली बॅंकेच्या शेजारील रोहित्राचे कंपाऊंड हलविणे.
६) शहापूर शाखेअंतर्गत येणाऱ्या सर्व विजवितरण संबंधित समस्यांचे सर्वेक्षण करणे.
७) शहापूर शहर शाखा अभियंता चेतन वाघ यांची वरिष्ठांशी केलेल्या चर्चेनुसार इतरत्र बदलीची ३१ जुलै पर्यंत लेखी हमी.
या सर्व मागण्या येत्या आठ दिवसांत पूर्ण करण्याची हमी दिली असल्याने उद्या दि.१५ जुलै रोजी होणारे घेराव आंदोलन स्थगित करीत आहोत याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती.
शिवसेना सदैव सामान्य जनांच्या समस्यांना वाचा फोडून या प्रश्नाची तड लावण्यासाठी कटिबद्ध आहे.
या सर्व मागण्यांचे लेखी आश्वासन संबंधित अधिकारी कार्यकारी अभियंता श्री.रामटेके साहेब व उप अभियंता श्री.अविनाश कटकवार साहेब यांनी दिले. यावेळी श्री उपासे साहेब, पोलीस निरीक्षक आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री.शंकर खाडे साहेब, माजी आमदार श्री.पांडुरंग बरोरा साहेब, तालुका प्रमुख श्री.मारूती धिर्डे साहेब, तालुका संपर्कप्रमुख श्री.अरूण कासार साहेब, तालुका संपर्कप्रमुख श्री.तळपाडे सर,श्री सुधीर तेलवने,श्री सुरेन्द्र तेलवने, श्री.गौतम गोडे,श्री.विजय देशमुख आदी मान्यवर व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0