श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे रक्तदान

12 Jul 2021 15:33:46
उरण : राज्यात रक्त व प्लाज्माची असलेली कमतरता, प्रचंड तुटवडा लक्षात घेता गोरगरिबांना वेळेत रक्त व प्लाज्मा उपलब्ध व्हावे, रक्त व प्लाज्मा अभावी कोणाचे मृत्यू होऊ नये या दृष्टी कोणातून उरण तालुक्यातील दत्त मंदिर सभामंडप, पाणदिवे येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याच्या वतीने संस्थेचे कार्याध्यक्ष पत्रकार विठ्ठल ममताबादे यांच्या संकल्पनेतून, समर्पण ब्लड बँक घाटकोपर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला युवकांचा, नवतरुणांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून एकूण 65 रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले.
 
blood55_1  H x
 
सदर शिबिराचे उदघाटन कोप्रोलीचे सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल म्हात्रे यांच्या हस्ते झाले. सदर कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अमित पाटील, प्रशांत ठाकूर, खोपटा ग्रामपंचायतचे उपसरपंच सुजित म्हात्रे, कोप्रोली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य शुभांगी म्हात्रे,कोप्रोली ग्रामपंचायत सदस्य - नंदन म्हात्रे,दत्त मंदिर व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष -रमेश पाटील, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष -हरिश्चंद्र खारकर,सामाजिक कार्यकर्ते शशी पाटील, छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष कडू, जिव्हाळा फॉउंडेशनचे अध्यक्ष रुपेश पाटील, पंकज ठाकूर, शिक्षक सुधीर मुंबईकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनिल वर्तक, समर्पण ब्लड बँक घाटकोपर तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. विशेष बाब म्हणजे संस्थेचे सदस्य प्रेम म्हात्रे, हेमंत म्हात्रे यांचा यावेळी वाढदिवस होता. या शिवभक्तांनी रक्तदान करून आपला वाढदिवस समाजोपयोगी कार्यक्रमाने साजरा केला. संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील यांच्यासह संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनीही यावेळी रक्तदान केले.
Powered By Sangraha 9.0